![]()
अमरावती जिल्ह्यात ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. याच मोहिमेत चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ येथे गांजाची शेती करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपी देविदास उर्फ धनराज तुळशीराम सतवासे (वय ४८, रा. आनंद नगर, काटकुंभ) याला पकडले. त्याच्याकडून ५ किलो ७१२ ग्रॅम वजनाचा, २ लाख ८५ हजार ६०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, आरोपीने विक्रीच्या उद्देशाने शेतात गांजा लावला आहे. या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकला. चिखलदरा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पार पडली.
Source link
चिखलदऱ्यात गांजाची शेती; आरोपीसह 2.85 लाखाचा मुद्देमाल जप्त:गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई