Headlines

अमरावतीत 16 ऑक्टोबरला निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन:विविध संघटना सहभागी होणार, इर्विन चौकात दिवसभर धरणे




अमरावतीत १६ ऑक्टोबर रोजी विविध सामाजिक संघटनांनी इर्विन चौकात धरणे आंदोलन जाहीर केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची त्यांची मागणी आहे. दिल्लीत विद्यार्थी-युवकांच्या आंदोलनाला सत्ताधाऱ्यांकडून दडपले जात आहे. याचा निषेध करत दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावतीत हे धरणे आंदोलन केले जाईल. आंदोलनाचे समन्वयक तथा अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे नेते प्रा. साहेबराव विधळे यांनी ही माहिती दिली. शुक्रवारी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ हे आंदोलन होईल. यात विद्यार्थी, तरुण, कामगार, शेतकरी, व्यापारी सहभागी होतील. प्रमुख मागण्यांमध्ये एसआयआर रद्द करणे, मतपत्रिकेवर मतदान घेणे, मतांची हेराफेरी थांबवणे, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करणे यांचा समावेश आहे. हे आंदोलन “आम्ही अमरावतीचे लोक…” या बॅनरखाली होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *