![]()
मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या समाजातील तरुण-तरुणींना संगणक आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या दृष्टीने स्वावलंबी बनवण्यासाठी सारथी संस्थेने छत्रपती संभाजी महाराज युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम(सीएसएमएस-डीईईपी) सुरू केला. मात्र, गेल्या वर्षभरापासून सोलापूरसह राज्यभरातील प्रशिक्षण केंद्रांना निधीच दिला जात नसल्याने हा प्रशिक्षण कार्यक्रम ठप्प झाला आहे. त्यामुळे गेल्या या कोर्ससाठी नोंदणी केलेल्या ८० हजारांपैकी केवळ ३८ हजार तरुण-तरुणींचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून ४२ हजार जणांचे प्रशिक्षण अर्धवट राहिल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. सारथीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम २०२३ मध्ये सुरू केला. सहा महिन्यांच्या या संगणक डिप्लोमा कोर्समध्ये संगणक कौशल्ये, संवाद कौशल्ये आणि इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर उमेदवारांना विविध संगणक संबंधित शाखांमध्ये नोकरीच्या संधी आहेत. कोर्स सुरू झाल्यानंतर दोन वर्षात पहिल्या टप्प्यात ४० हजार आणि दुसऱ्या टप्प्यात ४० हजार तरुण आणि तरुणींनी या कोर्ससाठी नोंदणी केली. सुरुवातीला हा कोर्स चांगला चालला, पण जून २०२५ पासून निधीअभावी या कोर्सची नोंदणी बंद झाली आहे. शिवाय पूर्वीचेही अनुदान अद्याप मिळाले नसल्याने सुमारे ४२ हजार प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण अपूर्ण राहिले असल्याने तरुणांमधून नाराजी व्यक्त होत आहे. निधीच नसल्याने प्रशिक्षक केंद्रांनी प्रशिक्षण देणे बंद केले आहे. संगणक कोर्स पुन्हा सुरू करावा, अन्यथा आंदोलन कोर्स अर्धवट राहिल्याने हजारो तरुणांचे स्वप्न भंगले आहे. हा कोर्स सुरू करण्याची मागणी शासनाकडे सातत्याने करत आहोत. मनोज जरांगे पाटील, मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन कोर्स सुरू करण्याची मागणी केली आहे. कोर्स तातडीने सुरू करावा, अन्यथा आंदोलन करू सचिन तिकटे, सकल मराठा समाज
Source link
शासनाकडून निधीचा खड्डा; सारथी संगणक काेर्सला ब्रेक:42 हजार मराठा तरुणांचे प्रशिक्षण अर्धवट