Headlines

Sanjay Raut Targets Eknath Shinde Over Rapido Funding Controversy


रॅपिडो कंपनीने महाराष्ट्रातील काही मंत्र्यांना विविध मार्गाने उपकृत केले असून त्यांच्या मंडळांना आणि परिवहन मंत्र्यांच्या दहीहंडीला मोठे पैसे दिले आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला. परिवहन मंत्र्या

.

संजय राऊत म्हणाले की, रिक्षाचालकांना मराठी भाषेसाठी दिलेली 3 महिन्यांची मुदतवाढ मुख्यमंत्र्यांनी दिलेली नाही, तर ती अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी सांगून दिली आहे. यामागे आगामी उत्तर प्रदेश (युपी) निवडणुकांचे राजकीय गणित आहे.

शहांना विचारल्याशिवाय परिवहन मंत्री भेट देत नाहीत

संजय राऊत म्हणाले की, मी परिवहन मंत्र्यांना एक लोकप्रतिनिधी म्हणून रिक्षाचालकांचे प्रश्न मांडण्यासाठी वेळ मागत आहे, परंतु त्यांना मला भेटायला वेळ देता येत नाही. कारण त्यांचे पक्षप्रमुख दिल्लीत बसले आहेत. अमित शहा यांना विचारल्याशिवाय परिवहन मंत्री मला किंवा मराठी रिक्षाचालकांना भेटू शकत नाहीत. एकनाथ शिंदे स्वतः नापास आहेत, ते इतरांचे काम काय पाहणार? त्यांचे सर्व मंत्री नापास झाले असून ते पास होण्याच्या लायकीचेच नाहीत. आदित्य ठाकरे सध्या या सर्व प्रश्नांवर आणि मंत्र्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहेत.

पंजाबमध्ये अकाली दलाने भाजपसोबत जाऊ नये

संजय राऊत म्हणाले की, पंजाबमध्ये भाजपला स्वबळावर 5 जागाही मिळणार नाहीत, हे गेल्या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांना तिथे सहकाऱ्याची गरज आहे. मात्र, अकाली दल जर पुन्हा भाजपासोबत गेले, तर त्यांची उरली-सुरली प्रतिष्ठाही रसातळाला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा पंजाबशी सुडाने वागले. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळेच अकाली दल एनडीएतून बाहेर पडला होता. त्यामुळे आपण बाहेर का पडलो, याचा विचार त्यांनी पुन्हा एकदा केला पाहिजे.

संघ प्रमुखांनी अमेरिकेत जाऊन भारतातील हुकूमशाहीवर बोलावे

संजय राऊत म्हणाले की, आरएसएस ही काही सरकारी संस्था नाही. भारतात नसले तरी अमेरिकेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम असल्याने जगभरातील लोक तिथे जाऊन विचार मांडतात. मोहन भागवतांना तिथल्या सरकारने नव्हे, तर संघाच्या लोकांनीच बोलावले असेल. परंतु, ते अमेरिकेत जाऊन भारतातील सध्याच्या हुकूमशाहीवर काय बोलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारतातील विविध आंदोलनांवर ते इथे बोलले नसले, तरी परदेशात जाऊन देशातील वास्तविक परिस्थितीवर बोलतील, अशी जनतेची अपेक्षा आहे.

हे ही वृत्त वाचा टिपू सुलतान मुद्द्यावरून मुस्लिमांना नाहक त्रास:इथेनॉलमधून मोठा पैसा मिळत असल्याने सर्व पक्षांतील साखर सम्राट शांत- सुजात आंबेडकर

महाराष्ट्रात टिपू सुलतान यांच्या फोटोचा मुद्दा गेली 4 ते 5 वर्षे राजकीय स्वार्थासाठी चर्चेत आणला जात आहे. 2021 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ‘औरंगजेब आणि टिपू सुलतानाची औलाद’ असे वक्तव्य करून या विषयाला वेगळे वळण दिले. त्यानंतर मुस्लिम युवकांना त्रास देणे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे आणि त्यांचे व्यवसाय-दुकाने बंद पाडण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे मुस्लिम तरुणांसमोर नोकरी आणि रोजगाराची गंभीर समस्या निर्माण झाली आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.