Headlines

जनता रस्त्यावर उतरते तेव्हा मंत्र्यांनाही राजीनामा द्यावा लागला:देशाचे भविष्य रस्त्यावर रडतेय, सरकारने ज्ञानेशकुमारांना बाजूला करावे- रविंद्र धंगेकर




काही दिवसांपूर्वी एका केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा झाला तो होऊ नये यासाठी सरकारन हट्ट धरला पण जनता ज्यावेळी रस्त्यावर येते त्यावेळी मंत्र्यांनाही राजीनामा द्यावा लागतो. ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी जनता रस्त्यावर येत आहे, रोज लहान मुलांना मारहाण होते त्यांच्यावर लाठीचार्ज होतो, असे शिवसेनेचे नेते रविंद्र धंगेकर यांनी म्हटले आहे. रविंद्र धंगेकर म्हणाले की, देशाचे भविष्य जर असे रस्त्यावर रडत आहे. ज्ञानेशकुमार प्रकरणी सरकारची प्रतिमा ढासळत असेल तर सरकारने निर्णय घेत ज्ञानेशकुमार यांना काही दिवसांसाठी बाजूला केले पाहिजे. नाही केले तर प्रखर आंदोलन होईल असे चित्र देशामध्ये उभे राहताना दिसून येत आहे, असे धंगेकरांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या सत्ताकाळातही देशात मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) झालेले असताना आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणे पूर्णपणे तथ्यहीन आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे, असे शिवसेना नेत्या व प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी म्हटल्याने शिंदे गटात ज्ञानेशकुमार प्रकरणी एक वाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. आम्ही दिल्लीतच, आदेश आला की आंदोलन- वडेट्टीवार आज काय ठरते ते माहिती नाही पण आदेश आला की आम्ही तयारीमध्येच आहोत. काल सर्वांनी पाहिले की रस्ते जॅम केले, बॅरिकेट लावले, रेल्वे थांबवली. काल जमलेल्या जनसागरानंतर सरकारला लक्षात आले पाहिजे की ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा घेतला पाहिजे ही देशातील जनतेची मागणी आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगावर दबाव नसावा संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगातील कथित गैरप्रकार थांबले पाहिजेत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. निवडणूक आयोगावर कोणताही राजकीय दबाव असता कामा नये. यासोबतच ‘एसआयआर’ प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी आणि मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या सर्व 13 कोटी मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यात यावीत. कायंदे काय म्हणाले? काँग्रेसच्या सत्ताकाळातही देशात मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) झालेले असताना आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणे पूर्णपणे तथ्यहीन आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. विरोधकांकडे जनतेचे कोणतेही खरे मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत आणि त्यांचा जनाधार पूर्णपणे संपला आहे. त्यामुळेच कधी ईव्हीएम, कधी नीट, कधी एमपीएससी, तर कधी मतचोरीचा कांगावा करून देशात केवळ अराजकता आणि अस्थिरता निर्माण करण्याचे काम विरोधक करत आहेत, असा घणाघाती हल्लाबोल शिवसेना (शिंदे गट) नेत्या व प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी केला आहे. वाचा सविस्तर _________________________________________________________________________ हेही वाचा… मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी आता 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ: मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार अंतिम यादी मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. सुधारित वेळापत्रकानुसार दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून, अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *