![]()
संविधान हातात घेत ते धोक्यात आहे, असे म्हणत ते कसे नष्ट होईल, हे काम काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून सुरू आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. दिल्लीत जी काही राजकीय आंदोलने झाली, ती काही साधी बाब नाही; हे देशासाठी घातक आहे. अनेक परकीय शक्ती देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. काही जण परदेशी शक्तींचे बाहुले झाले आहेत. हा सर्व आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाचा भाग असल्याची शंका येत असून, देशाला अशांत करण्याचे आणि अराजकता माजवण्याचे कृत्य विरोधी पक्षाकडून सुरू आहे; जे अतिशय दुर्दैवी असून देशासाठी घातक आहे, असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, कालचा दिवस हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस होता; कारण देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी असे कधीही झाले नव्हते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने ज्या सर्व घटनात्मक संस्था उभ्या केल्या आहेत, त्यांच्यावर चाल करत जाणे आणि दबाव आणणे, ही घटना काल घडली. या कृत्यासाठी मी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा निषेध करतो. त्यांना न्यायव्यवस्थेकडून न्याय मिळवण्याचा अधिकार आहे, पण अशा प्रकारे मोर्च काढणे म्हणजेच न्यायव्यवस्थेचा अपमान आहे. त्यांनी याबद्दल माफी मागितली पाहिजे. देशात अराजकता पसरवण्याचे काम सुरू एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधी पक्ष आपल्या शेजारील देशांमध्ये काय झाले, याची उदाहरणे कायम देत असतात. त्यांना यातून नेमका कोणता संदेश द्यायचा आहे? त्यांना देश अस्थिर करायचा संदेश द्यायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर तीन वेळा पराभव झाल्यामुळे, आपल्याला निवडणुकीत जिंकता येणार नाही, याची खात्री विरोधकांना पटली आहे. म्हणूनच देशात अराजकता पसरवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळेच विरोधक निवडणूक आयोग आणि ईव्हीएम मशीनवर आरोप करतात, पण कोणताही पुरावा देत नाहीत. ..तिथे विरोधी पक्षाने व्होट चोरी केली का? एकनाथ शिंदे म्हणाले की, निवडणूक आयोगावर टीका करणारे विरोधी पक्षातील नेते हे विसरतात की, याच निवडणूक आयोगाने घेतलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते केरळ, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू यांसारख्या राज्यांमध्ये जिंकले होते, मग तिथे काय त्यांनी मते चोरली होती का? असा सवाल त्यांनी केला. देशाच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम हे लोक करत आहेत. सैन्याच्या कामावर प्रश्नचिन्ह हा देशद्रोह एकनाथ शिंदे म्हणाले की, देशाच्या सरन्यायाधीशांबद्दल नेमकी कोणती भाषा वापरावी, हेदेखील विरोधकांना कळत नाही. यावरून देशात कोणती प्रवृत्ती वाढीस लागत आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. देशातील कोणत्याही यंत्रणेवर आणि संस्थेवर त्यांचा विश्वास नाही. निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत या सर्वांवर ते आक्षेप घेत आहेत. सैन्याच्या कामावर सुद्धा ते प्रश्नचिन्ह उपस्थित करून देशद्रोह करत आहेत. पत्रकारांना सुद्धा ते अनेक वेळा गोदी मीडिया म्हणतात, तर पोलिसांना गली के गुंडे म्हणतात आणि पंतप्रधानांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांची उदाहरणे देत तशीच परिस्थिती येथे निर्माण करायची आहे. हा सर्व आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा भाग आहे. विदेशी ताकदीच्या षड्यंत्रामध्ये ही लोकं सहभागी एकनाथ शिंदे म्हणाले की, जनता विरोधकांना नक्कीच धडा शिकवेल. पण खोटं बोलून देशातील जनतेमध्ये अविश्चास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या डोळ्यात विकास खुपतो आहे. विदेशी ताकदीच्या षड्यंत्रामध्ये ही लोकं सहभागी होत आहे. अनेक देश डबघाईला आली असताना आपली ताकद वाढत आहे. हे देशाविरोधात बोलतात पाकिस्तानची भाषा बोलतात. ———————————————– हेही वाचा… मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी आता 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ: मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार अंतिम यादी मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. सुधारित वेळापत्रकानुसार दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून, अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी आंदोलने करून राजीनामे मागणाऱ्या विरोधकांचा जनाधार संपला:मनीषा कायंदे यांचा काँग्रेसवर पलटवार, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार!
“काँग्रेसच्या सत्ताकाळातही देशात मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) झालेले असताना आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणे पूर्णपणे तथ्यहीन आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. विरोधकांकडे जनतेचे कोणतेही खरे मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत आणि त्यांचा जनाधार पूर्णपणे संपला आहे. त्यामुळेच कधी ईव्हीएम, कधी नीट, कधी एमपीएससी, तर कधी मतचोरीचा कांगावा करून देशात केवळ अराजकता आणि अस्थिरता निर्माण करण्याचे काम विरोधक करत आहेत,” असा घणाघाती हल्लाबोल शिवसेना (शिंदे गट) नेत्या व प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी केला आहे. वाचा सविस्तर
Source link
काही जण परदेशी शक्तींचे बाहुले झालेत:कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस, राहुल गांधींच्या मोर्चावर एकनाथ शिंदेंची टीका