Headlines

पुण्यात ज्येष्ठ महिलेची 68 लाखांची सायबर फसवणूक:बँक खात्यात काळ्या पैशांचे व्यवहार झाल्याची धमकी देत लुबाडले




पुण्यात सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची ६८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. अटकेची धमकी देऊन चोरट्यांनी ही रक्कम उकळली. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ६५ वर्षीय महिला कोथरूडमधील डहाणूकर कॉलनी परिसरात राहतात. सायबर चोरट्यांनी त्यांना फोन करून सांगितले की, त्यांच्या बँक खात्यातून काळ्या पैशांचा व्यवहार झाला आहे आणि हे पैसे दहशतवादी संघटनांना पाठवले आहेत. या प्रकरणात तपास यंत्रणांकडून अटक केली जाईल, अशी धमकी त्यांना देण्यात आली. अटक टाळण्यासाठी लगेच पैसे भरावे लागतील, असे चोरट्यांनी सांगितले. गेल्या आठ महिन्यांत चोरट्यांनी महिलेला वारंवार धमकावून त्यांच्याकडून ६८ लाख रुपये घेतले. ही रक्कम सायबर चोरट्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. त्यानंतरही पैशांची मागणी सुरूच होती. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ज्येष्ठ महिलेने नुकतीच पोलिसांत तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते या प्रकरणाचा तपास करत आहेत. मांजरीतील जमीन व्यवहारात ६४ लाखांची फसवणूक मांजरी बुद्रुक येथील जमिनीच्या बांधकामासाठी पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करून करारातील अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६४ लाख रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल झाली आहे. जमीन व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांचा तपास पोलिस करीत आहेत. याप्रकरणी श्रीनिवास भाई रेड्डी, शारदा श्रीनिवास रेड्डी, चंद्रकांत किसन बहिरट आणि पोपट ज्ञानोबा बहिरट (पत्ते अनुक्रमे अमनोरा टाउनशिप, पुणे व महादेवनगर, पुणे) यांच्यावर मांजरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रंजना झा (वय ५३, रा. बी.टी. कवडे रोड, घोरपडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२० पासून दि. ११ ऑक्टोबर २०२६ पर्यंतच्या कालावधीत सर्व्हे क्रमांक १२५-ब, मांजरी बुद्रुक येथील जमिनीच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. बांधकामासाठी गुंतवणूक करून घेऊन ठरलेल्या अटींचे पालन न करता आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *