Headlines

गुटखा विक्री प्रकरणात पोलिसाने मागितली खंडणी:पाच लाखांची मागणी करत साथीदारासोबत 1.65 लाख रुपये घेतले; दोघांवर गुन्हा दाखल




किराणा माल दुकानात गुटखा प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पाच लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी पोलीस शिपायासह दोघांविरुद्ध फुरसुंगी पोलिसंनी गुन्हा दाखल केला. पोलीस कर्मचाऱ्याने साथीदाराच्या मदतीने एक लाख ६५ हजार रुपये घेतल्याचे फिर्यादीत म्हटले अहो. या प्रकरणी पोलीस कर्मचारी रामकिसन हंबर्डे, सतीश मोरे (रा. वडकी, हडपसर-सासवड रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका किराणा माल दुकानदाराने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार किराणा माल व्यापाऱ्याचे हडपसर-सासवड रस्त्यावरील उरळी देवाची परिसरात दुकान आहे. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी पोलीस कर्मचारी आणि त्याचाबरोबर असलेला एक आरोपी दुकानात आले. किराणा माल दुकानात गुटखा विक्री करत असून, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी धमकी पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना दिली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने किराणा माल दुकानदाराकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. त्या वेळी एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे किराणा माल दुकानदाराने दोघांना सांगितले. तडजोडीत पोलीस कर्मचाऱ्याने साथीदाराच्या मदतीने त्याच्याकडून एक लाख ६५ हजार रुपये घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणात खंडणीचा प्रकार धमकावून पैसे घेतल्यानंतर दुकानदााने फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश खांडे तपास करत आहेत. किराणा माल दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले. सीसीटीव्ही चित्रीकरण समाज माध्यमात प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस कर्मचाऱ्याचे संभाषण सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळले. पोलीस कर्मचारी साध्या वेशात दुकानात आला होता. किराणा माल दुकानातील कामगाराने रोकड आणून पोलीस कर्मचाऱ्याला दिल्याचे दिसून आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *