![]()
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज असल्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. काही महत्त्वाच्या बैठकांना त्यांनी मारलेली दांडी आणि दिल्ली दौऱ्यामुळे या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. याच चर्चेवर आता शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एकनाथ शिंदे साहेब नाराज नाहीत, पण ते जर नाराज झाले, तर थेट स्फोटच होईल आणि सरकार बदलून जाईल,” असं अत्यंत सूचक विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. अमरावतीमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही फटकेबाजी केली आहे. “शिंदे साहेब सदाबहार, त्यांना कुणी नाराज करू नये” बच्चू कडू म्हणाले, एकनाथ शिंदे नाराज होत नाहीत, मला माहीत आहे ते सदाबहार आहेत. त्यामुळे कुणीही त्याची चिंता करू नये. पण ते जर नाराज झाले, तर स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे त्यांना कोणीही नाराज करू नये, एवढीच माझी विनंती आहे.” कडू यांच्या या विधानामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल आहे का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. बैठकांना दांडी मारल्याच्या प्रश्नावर कडूंची पाठराखण शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी दुष्काळाच्या बैठकीला आणि काल वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला दांडी मारल्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्र्यांची पाठराखण केली. “त्यांना काही काम असेल म्हणून ते उपस्थित राहू शकले नसतील. पण शिवसेनेचे बाकीचे मंत्री तर तिथे हजर होते ना,” असे सांगत त्यांनी या विषयावर पडदा टाकला. निवडणुकीत मतभेद नसतात, लक्ष जिंकण्यावर असतं महायुतीमध्ये अंतर्गत मतभेद आहेत का, या प्रश्नावर बोलताना कडू यांनी स्पष्ट केले की, “मला नाही वाटत काही मतभेद आहेत. निवडणुकीच्या काळात कोणतेही छोटे-मोठे पक्ष मतभेद करत बसत नाहीत. सर्वांना आपापले उमेदवार जिंकून आणायचे असतात. त्यामुळे निवडणुकीनंतर जे काही होईल ते मला माहीत नाही, पण सध्या तसे काही नाही.” नाराज झाले तर सरकार बदलून जातं! बच्चू कडू यांनी आपल्या खास शैलीत महायुतीतील नेत्यांना सूचक इशारा दिला. “नाराज झाले तर स्फोटच होणार ना! एकनाथजी शिंदे साहेब तिकडे नाराज झाले तर थेट स्फोटच होईल आणि आम्हाला माहीत आहे, सरकार बदलून जातं. त्यामुळे हे मोठे नेते कधी सहसा नाराज होत नसतात,” असेही कडू यांनी स्पष्ट केले. ———————- हेही वाचा.. काही जण परदेशी शक्तींचे बाहुले झालेत: कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस, राहुल गांधींच्या मोर्चावर एकनाथ शिंदेंची टीका
संविधान हातात घेत ते धोक्यात आहे, असे म्हणत ते कसे नष्ट होईल, हे काम काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून सुरू आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. दिल्लीत जी काही राजकीय आंदोलने झाली, ती काही साधी बाब नाही; हे देशासाठी घातक आहे. अनेक परकीय शक्ती देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. काही जण परदेशी शक्तींचे बाहुले झाले आहेत. हा सर्व आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाचा भाग असल्याची शंका येत असून, देशाला अशांत करण्याचे आणि अराजकता माजवण्याचे कृत्य विरोधी पक्षाकडून सुरू आहे; जे अतिशय दुर्दैवी असून देशासाठी घातक आहे, असेही ते म्हणाले. सविस्तर वाचा
Source link