Headlines

रायगडमध्ये मोठी दुर्घटना:कस्तुरी लॉजिस्टिक कंपनीचे निर्माणाधीन शेड कोसळले; एका कामगाराचा मृत्यू, 20 ते 25 जखमी




रायगड जिल्ह्यातील मानकिवली गावाजवळ एक भीषण घटना घडली आहे. येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या ‘कस्तुरी लॉजिस्टिक’ कंपनीचे भलेमोठे शेड अचानक कोसळल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत तब्बल २० ते २५ कामगार जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. नेमकी घटना कशी घडली? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मानकिवली गावाच्या हद्दीत कस्तुरी लॉजिस्टिक कंपनीच्या नवीन शेडचे बांधकाम वेगाने सुरू होते. या ठिकाणी अनेक मजूर रोजंदारीवर काम करत होते. नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच शेडचा वरील सांगाडा अचानक खाली कोसळला. हा प्रकार इतक्या अचानक घडला की, कामगारांना तिथून पळ काढण्याची किंवा स्वतःचा बचाव करण्याची संधीच मिळाली नाही. अनेक कामगार या लोखंडी ढिगाऱ्याखाली दबले गेले, ज्यामध्ये एका मजुराला जागीच आपला जीव गमवावा लागला. खोपोली रुग्णालयात युद्धपातळीवर उपचार सुरू या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व कामगारांना तातडीने बाहेर काढण्यात आले. जखमी झालेल्या २० ते २५ कामगारांना तात्काळ खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे डॉक्टरांच्या टीमकडून त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत. मात्र, गंभीर जखमी असलेल्या दोन मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. दुर्घटनेच्या कारणांचा तपास महत्त्वाचा शेडचे काम सुरू असताना ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, बांधकामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का आणि शेड कोसळण्यामागे कोणते कारण होते, याबाबत तपासातून स्पष्टता येणार आहे. या घटनेनंतर बांधकामाच्या सुरक्षिततेचा आणि कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. —————- हेही वाचा.. नागपूर हादरले: पत्नीच्या पहिल्या पतीकडून दुसऱ्या पतीवर प्राणघातक हल्ला, एकाला अटक, इतरांचा शोध सुरू नागपूर शहरातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. महिलेच्या पहिल्या पतीकडून दुसऱ्या पतीवर धारदार शस्त्र आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. याहल्ल्यात वसीम अख्तर हे गंभीर जखमी झाले आहे. नागपूरच्या गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केटीनगर येथे ही घटना घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *