Headlines

Raju Shetti Slams Dilip Walse Patil Over Sugarcane Price Controversy


“यंदाच्या गाळप हंगामात उसाला प्रतिटन 5500 रुपये दर मिळावा ही शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे. साखरेची किमान विक्री किंमत (MSP) 50 रुपये आणि इथेनॉलचा दर 70 रुपये करा, अशी स्पष्ट मांडणी आम्ही केली आहे. तुम्ही वर्षानुवर्षे राष्ट्रीय व राज्य साखर संघाचे अध्य

.

दिलीप वळसे पाटील यांनी राजू शेट्टींच्या उसाच्या 5500 रुपयांच्या मागणीवर “उसाला एवढा दर द्यायला काय तुमच्या काकांनी पैसे ठेवलेत का?”, असा उपरोधिक सवाल केला होता. त्याला राजू शेट्टी यांनी अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिल्याने आगामी गाळप हंगामाच्या तोंडावर साखर सम्राट विरुद्ध शेतकरी संघटना असा राजकीय व सामाजिक संघर्ष पेटला आहे.

दिल्लीतील बैठकीत तोडगा नाही; आज कोगनोळी टोलनाक्यावर ‘चक्का जाम’

नवी दिल्लीतील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (पुसा) येथे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत साखर उद्योग आणि शेतकरी प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आरपारची लढाई पुकारली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर महामार्ग रोखणार

आज (13 ऑक्टोबर) पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोलनाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येत आहे. “इथेनॉलचे दर वाढवणे आणि साखरेची एमएसपी 50 रुपये करणे यावर जोपर्यंत केंद्र शासन लेखी निर्णय घेत नाही, तोपर्यंत सीमाभागातील हा महामार्ग खुला केला जाणार नाही,” असा ठाम इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. या आंदोलनात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कर्नाटकातील सीमाभागातील हजारो शेतकरी ट्रॅक्टर व वाहनांसह दाखल होत आहेत.

सीमाभागात 2 हजार पोलिसांचा पहारा; कर्नाटक पोलिसांची कडक भूमिका

महामार्गावरील संभाव्य कोंडी आणि आंदोलनाचा विस्तार पाहता कर्नाटक पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे. बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर तीन महत्त्वाच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

2 हजार पोलीस कर्मचारी रस्त्यावर

वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून तब्बल 2 हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. आंदोलकांना महामार्गाच्या कडेला शांततेने आंदोलन करण्याची मुभा असेल; मात्र कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे रोखू दिली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच अवजड वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खते, मजुरी आणि डिझेलचे भाव वाढले, त्याचे काय?; केंद्राच्या बैठकीत शिवराजसिंहांची कोंडी

दिल्लीतील बैठकीचा पाढा वाचताना राजू शेट्टी यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांसमोर मांडलेल्या वास्तवाची माहिती दिली. “बैठकीत केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दरवर्षी उसाच्या एफआरपीमध्ये (FRP) वाढ केल्याचे सादरीकरण दाखवले. यावर मी त्यांना बैठकीतच सुनावले की, एफआरपी कागदावर वाढली असली तरी रिकव्हरीचा बेस वाढवून तुम्ही शेतकऱ्यांचा नफा काढून घेतला आहे. खते, कीटकनाशके, बियाणे, मजुरी, तोडणी व वाहतूक खर्च कित्येक पटींनी वाढला, त्याची माहिती तुमच्या खात्याकडे आहे का? शेतकऱ्यांचे हे भीषण वास्तव मांडण्यासाठी मी गेल्या दोन वर्षांपासून केंद्रीय मंत्र्यांकडे वेळ मागत आहे; पण सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकायला वेळ नाही, हे मी थेट बैठकीतच खडसावून सांगितले.”

साखर अडवण्याचा इशारा

“साखरेचा हमीभाव आठ वर्षांपासून 31 रुपयांवर अडकून पडल्याने बँकांकडून कारखान्यांना मिळणारे मूल्यांकन आणि कर्ज मर्यादित झाले आहे. त्यामुळे कारखानेही अडचणीत आहेत. जर केंद्राने इथेनॉल आणि साखरेच्या दरावर तातडीने निर्णय घेतला नाही, तर उद्यापासून महामार्गासह साखर कारखान्यांमधून बाहेर पडणारा साखरेचा एकही ट्रक रस्त्यावर धावू देणार नाही,” असा एल्गार राजू शेट्टी यांनी पुकारला आहे.

—————————————————-

हेही वाचा…

रोहित पवार म्हणजे महाराष्ट्राचे नवे पप्पू!: व्हिडिओ दाखवत विक्रम पाचपुतेंची सडकून टीका, म्हणाले- आंदोलनस्थळी राष्ट्रध्वज अन् संविधान सोडून गेले

“पुण्यात एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या 12 दिवसांच्या आंदोलनानंतर अखेर तोडगा निघाला, यात मध्यस्थी करणारे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि चौथ्यांदा संवेदनशीलतेने वेळ देणारे मुख्यमंत्री यांचे आभार. मात्र, हे आंदोलन संपल्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि विविध पक्षांतील नेत्यांना एकच प्रश्न भेडसावतोय—हे आंदोलन नक्की कशासाठी होते आणि यातून साध्य काय झाले? 30 सप्टेंबरलाच मुख्यमंत्री महोदयांनी न्यायालयीन चौकशी मान्य केली होती, मग हा 12 दिवसांचा संघर्ष कोणासाठी ताणला? केवळ स्वतःच्या राजकीय लाँचिंगसाठी आणि गांधी परिवाराला खूश करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भावनांचा गैरवापर करणारे रोहित पवार म्हणजे महाराष्ट्राचे नवे ‘पप्पू’ आहेत,” अशी जहरी टीका भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.