Headlines

कर्जमाफीचे काय झाले; आमदार ‎सत्तारांचा राज्य सरकारला प्रश्न‎:मुख्यमंत्र्यांना पत्र देऊनही स्पष्टीकरण नसल्याचा दावा‎




नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च‎‎रोजी कर्ज भरले‎‎नसल्यामुळे आता ते‎‎थकबाकीदार झाले आहेत.‎‎ कर्जमाफीची तारीख‎‎ जून ऐवजी सप्टेंबर ‎‎ठेवल्यामुळे ‎मराठवाड्यातील १० लाख अतिवृष्टग्रस्त ‎शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार‎ असल्याची माहिती माजी कृषीमंत्री अब्दुल‎ सत्तार यांनी दिली. जाहीरनाम्यात दिलेल्या‎ कर्जमाफीच्या वचनाचे काय झाले, असा प्रश्न ‎शेतकरी विचारत असल्याचेही त्यांनी‎ सांगितले.‎ कर्जमाफीबाबत अद्याप निकषच स्पष्ट‎करण्यात आले नाहीत. त्यामुळे कर्जमाफी‎कशी होणार याची अधिकाऱ्यांनाच काही‎माहिती नाही. त्यामुळे शेतकरवर्गात संभ्रम‎निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.‎ शेतकरी दोन्ही सवलतीपासून‎व‌ंचित, ५० हजारांचे नुकसान‎ माजी मंत्री सत्तार यांनी सांगितले की, मी‎सभागृहात तसेच मुख्यमंत्र्यांनादेखी ल‎पत्र दिले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी‎याबाबत स्पष्टीकरण दिले नाही.‎शेतकऱ्यंाना दीडपटीने कर्ज द्यावे लागेल‎तसेच फिरते भांडवल शेतकऱ्यांच्या हाती‎द्यावे लागेल. नियमित कर्ज भरणारे‎शेतकरी डिफॉल्टर झाल्यामुळे त्यांना ५०‎हजारांची सवलत मिळणार नाही.‎ अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात १० लाख ‎शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.‎ शेतकरी‎ डिफॉल्टर झाल्याने‎बँकेच्या मतदानास मुकणार‎ सत्तार म्हणाले, आता जिल्हा मध्यवर्ती‎बँकेच्या निवडणुका आहेत. शेतकरी‎डिफॉल्टर झाला तर मतदानाचे‎अधिकार मिळणार नाहीत. आता‎शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली तरी त्यांना‎किमान दीडपटीने कर्ज द्यावे लागणार‎आहे. ते दिले तरच शेतकऱ्यांना त्याचा‎काही फायदा होईल. अन्यथा त्याच्या‎हाती काही येणार नाही, असे त्यांनी‎सांगितले. राज्य सरकारने या बाबत‎तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.‎ दिलेल्या जाहीरनाम्याचे काय ? शेतकऱ्यांना मदत करेल तो खरा पक्ष.‎आम्ही निवडणुकीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या‎सह्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा वचननामा दिला‎होता. तो शेतकरी आम्हाला विचारत आहे, असे सत्तार यांनी सांगितले.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *