Headlines

कृषी:कांदा दरात झालेल्या घसरणीने बळीराजाच्या अडचणीमध्ये वाढ; प्रतिक्विंटल १२०० पर्यंत घसरण, शेतकरी भाववाढीच्या प्रतिक्षेत




प्रतिनिधी | अहिल्यानगर महिनाभराच्या कालावधीत जिल्हाभरातील कांद्याच्या दरामध्ये मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला कांद्याला मिळणारा भाव एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लक्षणीयरीत्या खाली आला असून, यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम झाला आहे. मागील महिनाभरातील स्थिती पाहता सुमारे प्रतिक्विंटल सुमारे ३०० रुपयांची घसरण झाली आहे. सद्यस्थितीत एक नंबर कांदा अवघा ९०० ते १२०० रुपये दराने विकला जात आहे. मार्च महिन्याच्या मध्यंतरापर्यंत बाजारपेठेत कांद्याचे दर आधीच समाधानकारक नव्हते. १२ मार्च रोजी कांद्याचे उच्चांकी सुमो १४०० ते १५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. मात्र, हा दर फार काळ टिकला नाही. २१ मार्चच्या सुमारास बाजारभावात घसरण सुरू होऊन कमाल दर १३०० रुपयांपर्यंत खाली आले. २६ मार्च रोजी देखील हीच स्थिती कायम होती, उच्च प्रतीच्या कांद्याला १३०० ते १३५० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत होता. एप्रिल महिन्याची सुरुवात झाल्यानंतरही दरातील ही मरगळ कायम आहे. ११ एप्रिल रोजीच्या ताज्या आकडेवारीनुसार, कांद्याचे कमाल दर सुमारे ९०० ते १२०० रुपयांच्या दरम्यान स्थिरावले. नंबर २ प्रतीच्या कांद्याच्या दरातही मोठी घट झाली असून, मार्चमध्ये नंबर दोन कांद्याला १००० रुपयांचा भाव आता ६०० ते ९०० रुपयांपर्यंत खाली घसरला आहे. विशेषतः गोल्टी कांद्याच्या दरातही महिनाभरात १०० ते १५० रुपयांची घसरण पहायला मिळाली त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या बाजारात नवीन गावरान कांद्याची आवक वाढू लागली असली, तरी दरात सुधारणा न झाल्याने शेतकरी वर्ग अपेक्षित भाववाढीच्या प्रतीक्षेत आहे. अत्यल्प दरामुळे शेतीत झालेला खर्चही वसूल होत नाही. १२ एप्रिलचे बाजारभाव (प्रतिक्विंटल) .नेप्ती उपबजार समिती : त्यात एक नंबर कांदा ९०० ते १२००, दोन नंबर कांदा ६०० ते ९०० तर तीन नंबर कांदा ३०० ते ६०० रुपये. . वांबोरी उपबाजार समिती : एक नंबर ९०० ते १३००, दोन नंबर कांदा ५०० ते ९०० तर तीन नंबर कांदा १०० ते ५०० रुपये, प्रतिक्विंटल दराने विकला गेला. तीन महिन्यांतर बरे दिवस ^ पाणी पावसावर गणित अवलंबून आहे. पुढील तीन महिन्यानंतर कांद्याला चांगला दिवस येऊ शकतील, असा माझा अंदाज आहे. कारण मध्यप्रदेशातील कांदा उत्पादन यंदा काही अंशी कमी आहे. त्यांचा कांदा कमी पडल्यास महाराष्ट्रातील कांद्याच्या दरात काहीअंशी वाढ होईल. सध्याच्या दरघसरणीला आखाती युद्धाचेही कारण आहे. युद्ध थांबल्यास, कांद्याच्या दरात काही अंशी सुधारणा होईल. योगेश महाजन, कांदा निर्यातदार, केळवण, नाशिक.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *