![]()
महापुरुषांची जयंती उत्सव म्हटले की डीजेचा दणदणाट, डामडौल अशी स्थिती असते.मात्र बेलापूर ग्रामपंचायत,सावता मंडळ,एम.पी. सोसायटी, महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने बेलापूरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जयंती सोहळा बेलापूरच्या भूमीतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भूमिपुत्रांना पुरस्कार देऊन आगळ्यावेगळ्या उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा झाला. बेलापुरात महात्मा फुले जयंतीचा मुख्य सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला. येथे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत, सहकारी सोसायटी येथेही प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती समितीच्या वतीने कै. गणपत टेकाडे,कल्पना सुभाष वाघुंडे, नवनाथ कुताळ, अशोक राशिनकर, देविदास देसाई, किशोर राऊत, ऋषिकेश भागवत, रफीक बागवान, एकनाथ रोकडे,कचरू शिंदे आदींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. जयंती सोहळ्यास विविध संस्थाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत व सोसायटीचे पदाधिकारी, सावता मंडळाचे व क्रांतीज्योती महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
Source link
डीजेच्या दणदणाटाऐवजी बेलापुरात भूमिपुत्रांचा गौरव:आगळ्यावेगळ्या पद्धतीने महात्मा फुले जयंती साजरी