Headlines

डेटिंग ॲपद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश:हॉटेलमध्ये नेऊन युवकांना घातला जात होता लाखोंचा गंडा, नागपुरातील घटना




नागपूरमध्ये डेटिंग ॲपच्या माध्यमातून युवकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. सदर परिसरातील माऊंट रोडवरील एका हॉटेलमध्ये हा प्रकार वारंवार घडत असून, यात संबंधित हॉटेलचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका विशिष्ट डेटिंग ॲपवरून युवकांशी ओळख केली जाते. त्यानंतर संबंधित मुलगी त्यांना सदरमधील ‘सुआ क्लब अँड रेस्ट्रो’ येथे भेटण्यासाठी बोलावते. नागपूरमधील सदर भागात, माउंट रोडवर असलेला हा क्लब रात्री १ वाजेपर्यंत सुरू असतो. भेटीदरम्यान, मुलगी स्वतःहून मेन्यू कार्ड न दाखवता महागड्या पदार्थ आणि मद्याची ऑर्डर देते. युवकाला याची कल्पना नसताना मोठ्या प्रमाणात बिल तयार केले जाते. पीडितांकडून तब्बल ३० ते ३५ हजार रुपयांपर्यंत बिल वसूल करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकारात, मुलगी मद्यपान केल्यानंतर अचानक हॉटेलमधून निघून जाते आणि संपूर्ण बिलाची जबाबदारी युवकावर टाकली जाते. एका पीडित युवकाने हिंमत करून सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आतापर्यंत तीन ते चार पीडित समोर आले आहेत. यामागे हॉटेल व्यवस्थापन आणि संबंधित मुलगी यांच्यात संगनमत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुलगी प्रत्येक व्यवहारातून सुमारे १० ते २० टक्के कमिशन घेत असल्याची शक्यता आहे. हा प्रकार आतापर्यंत ४ ते ५ पीडितांसोबत घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, संबंधित मुलीने शनिवारी रात्री ११ वाजल्यापासून फोन स्विच ऑफ केला आहे, मात्र व्हॉट्सॲप सुरू असल्यामुळे ती ऑनलाइन असल्याचे दिसून येते. या घटनेमुळे नागपुरातील युवकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींशी डेटिंग ॲपवरून भेटताना सतर्क राहावे, तसेच कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी पूर्ण माहिती घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *