![]()
प्रतिनिधी | अकोला डोंगरगाव येथील माळी समाजाच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी गायत्री नागापुरे व तन्वी गवळी या विद्यार्थिनींनी तसेच उपसरपंच किशोर काकडे यांनी भाषणातून महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत समाजप्रबोधनातील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. शिक्षण, सामाजिक समता व स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याची माहिती देत उपस्थितांना प्रेरीत करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमोद भड, दीपक नागापुरे, रमेश देवकर, मधुकर देवकर, दिनकर भड, उत्तम काकडे, रमेश वानरे, मनोहर काकडे, श्रीराम वानरे, गोपाल नीलखन, काशीनाथ देवकर, नरेश नागापुरे, सुरेश काकडे, नामदेव वानरे, शिवदास मरकाम, हरिदास गवळी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक किशोर काकडे यांनी केले.
Source link
डोंगरगावात माळी समाजाकडून म. फुले यांची जयंती उत्साहात साजरी:ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन