![]()
प्रतिनिधी | दानापूर क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त तेल्हारा शहरात अखिल भारतीय माळी महासंघ तालुका शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. रॅलीची सुरुवात महात्मा फुले चौकातून करण्यात आली. यावेळी शेकडोच्या संख्येने समाजबांधव पिवळे फेटे परिधान करून सहभागी झाले होते. रॅलीची सांगता भागवत मंगल कार्यालय येथे करण्यात आली. नियोजन अरुण म्हसाळ, सजावट छोटू बोंबटकर, ट्रॅक्टर व साऊंड हेमंत नागपुरे, अनुराग बगाडे, नीलेश उमाळे, राजू उमाळे, नीलेश इंगळे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सचिन ठोमरे यांनी केले. परिचय ओमप्रकाश उगले यांनी करून दिला. प्रास्ताविक ॲड. श्रीकांत तायडे यांनी केले. आभार प्रशांत खाडे यांनी मानले. कार्यावर प्रकाशझोत सभेत संगीता अढाऊ, शत्रुघ्न बिरकड आणि प्रमिला वानखडे यांनी विचार मांडले. म. फुले यांनी समाजासाठी, विशेषतः शिक्षण आणि स्त्री हक्कासाठी केलेल्या कार्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. हिवरखेडचे नगरसेवक श्यामशील भोपळे, वंदना वानखडे, तेल्हारा नगरसेवक पंचफुला कवर, शिक्षिका प्रमिला वानखडे, ओमप्रकाश वेरूळकर, नीलेश सानप आदींचा सत्कार करण्यात आला.
Source link
तेल्हाऱ्यात फुले जयंतीचा जल्लोष:मोटारसायकल रॅलीने वेधले लक्ष