Headlines

बीडमध्ये निवडणुकीतील पराभव जिव्हारी:विजयी उमेदवाराच्या पतीला घेरून मारहाण; 5 ते 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल




बीड नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, निवडणुकीतील पराभव पचवणे कठीण झाल्याने शिवसेनेचे पराभूत उमेदवार व माजी सभापती बाळासाहेब जाधव यांनी आपल्या समर्थकांसह भाजप नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या खळबळजनक घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या प्रकारामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. बीडमधील प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपच्या भाग्यश्री देशपांडे यांनी मिळवलेला विजय शिवसेनेचे पराभूत उमेदवार बाळासाहेब जाधव यांना पचनी न पडल्याने, त्यांनी भाग्यश्रींचे पती सागर देशपांडे यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती. सातत्याने शिवीगाळ आणि धमक्या देणाऱ्या जाधव यांनी शुक्रवारी रात्री संधी साधून, सागर देशपांडे आपल्या घराबाहेर फोनवर बोलत उभे असताना आपल्या मुलासह आणि इतर 7-8 समर्थकांच्या मदतीने त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला चढवला. हल्लेखोरांनी सागर देशपांडे यांना घेरून काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, ज्यामध्ये त्यांच्या डोक्याला, पोटाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली असून, हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी सागर देशपांडे यांनी बीड शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शिवसेनेचे पराभूत उमेदवार बाळासाहेब जाधव, त्यांचा मुलगा आणि इतर 5 ते 6 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *