Headlines

भावाच्या निधनानंतर 17 तासांतच चुलत बहिणीलाही ट्रकने चिरडले:16 वर्षीय भावाचा अपघात; अंत्ययात्रेसाठी जाताना बहिणही ठार




प्रतिनिधी | अमरावती ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे सोळा वर्षीय मुलाचा गुरुवारी (दि. ९) रात्री मृत्यू झाला. त्याच्या अंत्ययात्रेसाठी भातकुलीवरून कानफोडीला जाणाऱ्या चुलत बहिणीचाही शुक्रवारी (दि. १०) दुपारी ट्रकने चिरडून झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. समाजमन सुन्न करणारी ही घटना भातकुली येथे घडली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण भातकुली तालुका आणि कानफोडी गावावर शोककळा पसरली आहे. नैतिक प्रदीपराव साबळे (१६) आणि समीक्षा ऊर्फ खुशी बाळासाहेब साबळे (१९, दोघेही रा. कानफोडी, ता. भातकुली) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बहीण-भावांची नावे आहेत. नैतिक आणि खुशी ही चुलत भावंडे होती. नैतिक भातकुली येथे राहून एमएससीआयटी करत होता. गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास भातकुली ते आसरा मार्गावर विरुद्ध दिशेने आलेल्या एका ट्रॅक्टरने नैतिकच्या दुचाकीसह अन्य एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात नैतिकचा मृत्यू झाला. नैतिकच्या आकस्मिक उर्वरित. पान ४ समीक्षा समीक्षा ही पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत होती. नैतिक काही दिवसांपूर्वीच गावातून भातकुली येथे राहायला आला होता. या अपघात प्रकरणात भातकुली पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. नैतिकला धडक देणाऱ्या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध शुक्रवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. समीक्षाला चिरडणाऱ्या ट्रक चालकाविरुद्ध शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नैतिक आणि खुशी चुलत बहीण-भाऊ असले तरी त्यांचे संबंध अत्यंत सुमधुर होते. या बहीण-भावातील प्रेमाची कल्पना यावरून येते की, समीक्षाच्या मोबाईलच्या स्क्रीनवर या दोघांचा हसता आणि आनंदी फोटो स्क्रीनसेव्हर होता. अवघ्या काही तासांच्या अंतरात बहिण-भावाचे हे नाते कायमचे तुटल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मोबाईल स्क्रीनवर भावासह समीक्षाचा फोटो जिल्ह्यातून शोक व्यक्त गुरुवारी रात्री आठ वाजता ट्रॅक्टरच्या धडकेत नैतिक गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर अवघ्या १७ तासांनी, समीक्षालाही ट्रकने चिरडले. १७ तासांच्या अंतराने कुटुंबातील दोन तरुण जीव गेले. इंजिनिअर होणाऱ्या समीक्षाचा काळाने केला घात



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *