Headlines

भोंदू अशोक खरात प्रकरण:प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलिसांत हजर; पथसंस्थेतील 2 कोटी 40 लाखांच्या व्यवहारांची होणार चौकशी




भोंदू अशोक खरात प्रकरणी प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रतिभा चाकणकर या रुपाली चाकणकर यांची बहीण असून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला होता. अशोक खरातने जी खाती वापरली, त्या खात्यांमध्ये प्रतिभा चाकणकर यांच्यासह त्यांचे मुलांच्या खात्यांचा सुद्धा समावेश होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्यांची चौकशी होणार आहे. रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिस ठाण्याने चार दिवसांपूर्वी नोटीस बजावली होती. समता पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार आहे. प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावे असलेल्या एकूण चार बँक खात्यांमधून तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली असून, या मोठ्या रकमेच्या स्त्रोताबाबत आणि व्यवहारांच्या स्वरूपाबाबत आता पोलिस सखोल तपास करणार आहेत. खरात समता पतसंस्थेतील 100 खात्यांवर नॉमिनी अशोक खरात हा समता पतसंस्थेतील 100 खात्यांवर, तर सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेतील 32 खात्यांवर नॉमिनी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यापैकी सिन्नरमधील खात्यांची चौकशी नाशिक ग्रामीण पोलिस करत असून समता पतसंस्थेतील व्यवहारांचा तपास शिर्डी पोलिसांकडून सुरू आहे. याच तपासाच्या साखळीचा भाग म्हणून आता प्रतिभा चाकणकर यांची चौकशी केली जाणार आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून आपला काळा पैसा पांढरा केल्याचा संशय अशोक खरातने या पतसंस्थेच्या माध्यमातून आपला काळा पैसा पांढरा केल्याचा संशय आहे. कारण, समता पतसंस्थेत खरात नॉमिनी असलेले 100 हून अधिक खाती आढळलेत. ही खाती 57 वेगवेगळ्या लोकांच्या नावे आहेत. त्यावरून 60 कोटींहून अधिकचा व्यवहार झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 33 खातेदारांची चौकशी पूर्ण झाली आहे. यापैकी बहुतांश लोकांना या पतसंस्थेत आपले खाते असल्याचेच माहिती नाही असा जबाब दिला आहे. आता प्रतिभा चाकणकर यांच्या चौकशीअंती काय माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. रुपाली चाकणकरांनाही एसआयटीकडून समन्स बजावल्याची माहिती अशोक खरातशी असणाऱ्या कथित संबंधांवरून रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यानंतर त्यांना सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदावरही पाणी सोडावे लागले आहे. खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने या प्रकरणी रुपाली चाकणकर यांना समन्स बजावल्याची माहिती आहे. पण त्याची पुष्टी होऊ शकली नाही. तूर्त सध्याचा घटनाक्रम पाहता त्यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *