Headlines

मनपा शाळांत आता वाचन संस्कृती रुजणार:शिक्षण विभागात सर्वसमावेशक आढावा, मनपा शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न‎


.

महानगर पालिका शाळांमध्ये केवळ शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर न देता विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षण, जीवनकौशल्ये आणि सर्जनशीलता विकसित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शाळांनी नवोपक्रमशील उपक्रम राबवावेत. भौतिक सुविधांच्या विकासाबरोबरच विद्यार्थ्यांना सुजाण, जबाबदार आणि सक्षम नागरिक म्हणून घडवण्याची जबाबदारी शिक्षण व्यवस्थेवर असल्याचे शिक्षण सभापती अॅड. प्रीती रेवणे यांनी अधोरेखित केले.

विस्तृत व महत्त्वपूर्ण आढावा बैठक शिक्षण सभापती अॅड. प्रीती रेवणे यांच्या अध्यक्षतेत झाली. या बैठकीत मनपा शाळांमधील पटसंख्या वाढ, वाचन संस्कृती रुजवण्यासाठी गुणवत्तापूर्ण, मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बैठकीदरम्यान सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांकडून त्यांच्या शाळांची सद्यस्थिती, विद्यार्थ्यांची पटसंख्या, शाळांमध्ये राबवण्यात येणारे विविध शैक्षणिक व शालेय उपक्रम, तसेच उपलब्ध सुविधा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शाळा चालविताना मुख्याध्यापकांना येणाऱ्या अडचणी, प्रशासकीय अडथळे, मनुष्यबळाची कमतरता, तसेच पायाभूत असुविधांशी संबंधित समस्या यांवरही खुल्या चर्चेद्वारे उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या बैठकीस महानगरपालिकेच्या ६३ शाळांचे मुख्याध्यापक तसेच प्रभारी मुख्याध्यापक उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करत आगामी शैक्षणिक वर्षासाठी दिशा ठरविण्याचा या बैठकीचा प्रमुख उद्देश होता.

शिक्षण सभापतींनी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे ही सर्व शाळांची प्राथमिक उर्वरित. पान ४ वाचन संस्कृती ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत प्रत्येक शाळेत ‘वाचन कोपरा’ किंवा सुसज्ज ग्रंथालय उभारले जाणार आहेत. स्वतः पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबवणार असून या अनुषंगाने वाचन स्पर्धा, कथाकथन सत्र, पुस्तक प्रदर्शन घेतले जाणार आहे. शिक्षक व विद्यार्थी यांनी एकत्रितपणे वाचनावर आधारित उपक्रम राबवल्यास शाळांमध्ये सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण होणार आहे.

प्रत्येक शाळेत वाचन कोपरा, ग्रंथालय उभारणार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *