![]()
प्रतिनिधी | लोहगाव प्रकल्पग्रस्त मावसगव्हाण गावापासून जवळच असलेल्या नाथसागर जलफुगवटा क्षेत्राकडे जाणारा रस्ता काटेरी झाडांपासून मोकळा करण्यात आला असून या कामासाठी मावसगव्हाण येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत नाथसागराच्या जलफुगवटा क्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्यालगत वाढलेल्या काटेरी झाडांचा प्रश्न स्वतःच्या पुढाकाराने सोडवला. हा रस्ता शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीला पाणी देण्यासाठी विद्युत पंप चालू करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून अनेक दिवसांपासून काट्यांमुळे ये-जा करणे कठीण झाले होते. प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून वेळेवर दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वखर्चाने जेसीबी मावसगव्हाण येथील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने जेसीबी यंत्राच्या सहाय्याने काटेरी झाडापासून शेतरस्ता मुक्त केला. छाया : रवींद्र शेलार मशीन आणून रस्त्यालगतची काटेरी झाडे हटवली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना धरणाकडे जाणे व मोटारी सुरू करणे सुलभ झाले आहे. या उपक्रमात माजी सरपंच संजय जाधव, मावसगव्हाणकर, नितेश जाधव, तसेच कडबाळ लहंगे यांनी पुढाकार घेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या कार्यामुळे गावात सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण झाले आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाने अशा कामांकडे वेळीच लक्ष देण्याची मागणी केली आहे. तसेच निवेदन देण्यात आले आहे.
Source link
मावसगव्हाणच्या शेतकऱ्यांनी केला शेताकडे जाणारा रस्ता काटेरी मुक्त:शेतकऱ्यांनी एकत्र येत प्रश्न स्वतःच्या पुढाकाराने सोडवला