Headlines

मुरुम विक्रीतून शासनाला मिळाला 1 कोटीचा महसूल:नगरसेविका स्नेहल खोरे यांच्या लढ्याला आले यश‎




श्रीरामपूर नगरपरिषदेच्या साठवण तलावातील मुरुम विक्रीवरून सुरू असलेल्या संघर्षाला मोठे यश मिळाले आहे. नगरसेविका स्नेहल केतन खोरे यांनी दिलेल्या लढ्यामुळे या मुरुमाची मोजणी होऊन विक्रीचा मार्ग मोकळा झाला. पहिल्या टप्प्यातच शासनाच्या तिजोरीत तब्बल १ कोटी ३ लाख ४१ हजार ८२० रुपयांचा महसूल जमा झाला. नगरपरिषदेच्या साठवण तलावाच्या रुंदीकरण व खोलीकरण कामातील मुरूम संगमनेर रस्त्यावरील नगरपरिषदेच्या प्लॉटवर साठवला होता. या मुरूमापैकी फक्त दोन ते अडीच हजार ब्रश मुरूम विक्री परवानगी देण्याचा प्रयत्न सुरू होता. याची माहिती मिळताच मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे व नगरसेविका स्नेहल खोरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे याबाबत तक्रार केली. मंत्री विखे यांच्या सूचनेनुसार मुरुमाची मोजणी करण्याची सुरवात श्रीरामपूर तहसील कार्यालयाने केली. आतापर्यंत ३१ हजार ६१६ ब्रास मुरुमाची मोजणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यापैकी १५ हजार ब्रास मुरूम खरेदीपोटी भारत कन्स्ट्रक्शन कंपनीने १ कोटी ३ लाख ४१ हजार ८२० रुपयांची रॉयल्टी जिल्हाधिकाऱ्यांकडे भरल्याचे समोर आले आहे. श्रीरामपूर नगरपरिषदेच्या मालकीच्या हजारो ब्रास मुरुमामुळे शासनाला अंदाजे ५ ते ६ कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे, असेही खोरे यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *