![]()
वडगाव खुर्द परिसरातील आरएमसी प्लांट चालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने प्रदूषण आणि अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्यसभा खासदार डॉ. प्रा. मेधा कुलकर्णी यांनी या प्लांटचे तातडीने स्थलांतर करावे, अशा सूचना महापौर आणि महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी शनिवारी सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द भागातील दत्तकृष्णाई मंगल कार्यालय ते प्रेयेजासिटी, मधुकोष सोसायटी, धायरी लेन 17अ, फॉर्चुनर सोसायटी परिसरातील अनधिकृत रेडीमिक्स प्लांटची पाहणी केली. यावेळी प्रयेजा पुरम सोसायटीचे अध्यक्ष गणेश पिंपळे, सचिव ॲड. प्रितेश चांडगे यांच्यासह पवन मोकाशी, संतोष कुलकर्णी, राजेंद्र पाटील, श्रीमती शर्मिला नाखारे, निलेश घोडके, शेखर लोहोटे, प्रशांत गोहाड, मनीष वैद्य, गिरीश चोरघे, स्वाती टिळक, मंगला ठाकरे, नंदिनी कुलकर्णी, हरिहर घोडके, वासुदेव गोहाड आणि प्रयेजा पुरम, प्रयेजा सिटी या सोसायटीमधील अनेक नागरिक उपस्थित होते. या पाहणीदरम्यान, आरएमसी प्लांटकडून नियमांचे पालन होत नसल्याचे, प्लांटमधून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचे आणि रेडिमिक्स वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर खासदार कुलकर्णी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच, महापौर आणि पुणे महापालिकेचे आयुक्त यांनी याबाबत त्वरीत कारवाई करून हे आरएमसी प्लांट बंद करावेत आणि त्यांचे स्थलांतर करावे, अशी विनंती त्यांनी केली. या भागातील अनधिकृत सिमेंट प्लांटमुळे परिसरात अतिघातक प्रदूषण होत आहे. सिमेंटची भुकटी हवेत मिसळून रहिवाशांच्या घरात येत असल्याने लहान मुले आणि वृद्धांना श्वसनाचा त्रास होत आहे. रस्त्यावर पडलेल्या सिमेंटमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत असून, डोळ्यांत धूळ गेल्याने श्वसनाचे आणि डोळ्यांचे आजार वाढले आहेत. यासंदर्भात रहिवाशांनी अनेक दिवसांपासून प्रदूषण नियंत्रण महामंडळ, पुणे महापालिका, वाहतूक पोलीस, नगरसेवक आणि आमदारांकडे तक्रारी केल्या आहेत, परंतु अद्याप यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
सदर रस्त्यावर प्रयेजा सिटी, प्रयेजा पुरम, आर्यन रेसिडेन्सी, कल्पवृक्ष व इतर अशा सहकारी संस्था आहेत. त्यामध्ये जवळपास हजार पेक्षा जास्त नागरीक राहातात. सदरचे रस्त्यावर मुळतः नांदेडसिटी, मधुकोष व खडकवासला येथून वारजे हिंजवडी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतुक प्रचंड प्रमाणात आहे. त्यातुन सदरचा रस्ता हा अत्यंत लहान व सदरचे वाहतुकीस आवश्यक एवढा नाही. सदरचे रस्त्यावरून सिमेंट प्लांन्ट मधून येणारी वाहने अत्यंत भरधाव असतात व एक गोष्ट अत्यंत गंभीर आहे की, सदरचे वाहने चालविणारे वाहन चालक हे नेहमी फोनवर बोलत असतात, त्यांचे गाडीमध्ये जोर जोरात आवाजात गाणे लावलेले असतात. त्यामुळे अपघात होवून नागरीकांचे जीवीताचा प्रश्न निर्माण झाला आहे. मध्यंतरी सिमेंट प्लांटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर अगदी बाजूने चालत जात असलेल्या पादचारी महिलेला एका RMC मिक्सर वाहनाने चिरडले. त्यामध्ये त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अनेक वेळा वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. परंतु, कोणीच याची दखल घेत नाही.
शेवटी नागरिकांनी याबाबत मेधा कुलकर्णी यांना याबाबत घालण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी आज शनिवारी या संपूर्ण भागाची पाहणी केली त्यावेळी अनेक भयानक गोष्टी समोर आल्या. या भागातील सिमेंट प्लांट हे कुठलेही पर्यावरणाचे नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आले तसेच या अगोदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन प्लांट बंद करण्यात आले असल्याचे सांगितले. परंतु बाकीचे का का सुरू आहेत याबाबत त्यांना काहीही स्पष्टीकरण दिले नाही. तसेच सिमेंट रेडी मिक्स वाहून येणाऱ्या डंपर मोठ्या वाहनांना नंबर प्लेट नसल्याचे निदर्शनास आले वाहतुकीचे नियम मोडून या वाहनांवर 22 ते 25 हजारांचा दंड असल्याचे यावेळी समोर आले.
Source link