Headlines

विनोदकुमार जैस्वाल यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार:वीस वर्षे भारतीय वायुदलात देशाची प्रदीर्घ सेवा करून निवृत्त




प्रतिनिधी | नाचनवेल कन्नड तालुक्यातील सारोळा येथील सैनिक विनोदकुमार जगदीश जैस्वाल हे वीस वर्षे भारतीय वायुदलात देशाची प्रदीर्घ सेवा करून निवृत्त झाले. ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्यासह कुटुंबाचाही सन्मान करण्यात आला. सन २००६ मध्ये भारतीय सैन्यामध्ये भरती झाले होते. गावातील पहिले वायुदलातील सैनिक आहेत. १२ एप्रिल रोजी सकाळी त्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली व देशभक्तीच्या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी त्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पूजन करून पुष्पहार घातला व विनम्र अभिवादन केले. त्यानंतर गावातील मंदिर येथे दर्शन व पूजन केले. यानंतर ग्रामस्थ व आलेल्या अतिथींच्या हस्ते त्यांचा सत्कार सन्मान कुटुंबासह करण्यात आला. याप्रसंगी आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. विशेष अतिथी म्हणून माजी सरपंच पी. एम. डहाके, डॉ. संजय गायकवाड, कल्याण जंजाळ, ग्रामविकास अधिकारी अशोक काळे, पंचायत समिती सदस्य सविता जंगले, उपसरपंच भागवत बिघोत, आप्पा टकले, जगन जंगले, दगडू आबा गाडेकर उपस्थित होते. विनोदकुमार जैस्वाल यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *