![]()
प्रतिनिधी | अकोला शहराच्या मलकापूर परिसरातील वाढीव वस्ती भागाला पाणीपुरवठा करणारा बुस्टर वीजपंप जळाल्याने मलकापूर गावठाणासह सुरेखा नगर, व्हीएचबी कॉलनी, बसेरा कॉलनी, भांडे कॉलेज आणि एमआयडीसीला लागून असलेला परिसर, बुद्ध विहारालगतचा परिसर, आकृतीनगर, दीपाली ले-आऊट, राजरत्न कॉलनी, आरोग्यधाम परिसरात गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांन नगरसेवक पराग गवई यांच्याकडे तक्रार केली होती. या भागाला आधीच चार दिवसाआड म्हणजे पाचव्या दिवशी पाणी मिळते. म्हणजे या भागाला केली होती. आठ दिवसांनंतरही पाणीपुरवठा झालेला नाही. नगरसेवकाच्या आक्रमक भूमिकेनंतर पाणीपुरवठा सुरू कमी- जास्त वीज पुरवठ्यामुळे हा बुस्टर पंप वारंवार जळून नादुरुस्त होतो आणि या भागाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. चार दिवसांपूर्वी जळालेला अद्याप दुरूस्त झालेला नव्हता हे पाहून प्रभागाचे वंचितचे नगरसेवक पराग गवई यांनी आक्रमक भूमिका घेताच मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी तातडीने जळालेला बुस्टर पंप दुरूस्त केला आणि पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला.
Source link
वीजपंप जळाल्याने मलकापूर वाढीववस्तीत चार दिवसांपासून पाणी नाही:मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांची पाण्यासाठी होतेय वणवण