![]()
चेन स्नॅचिंग प्रकारात एक धक्कादायक घटना घडली आहे. घरात घुसून चाकूचा धाक दाखवत अंगावरील सव्वातोळे सोन्याचे मिनी गंठण हिसकावण्याचा प्रकार उघडकीस आला. शिवगंगा नगरात एका वृद्ध महिलेच्या घरात ही घटना झाली. या प्रकरणी जयश्री अरुण केत (वय 72, रा. शिवगंगा नगर भाग 4, मजरेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरावर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. आतापर्यंत रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावण्याचे प्रकार झाले. आता चोरांचे धाडस इतके वाढले की, घरात घुसून शस्त्रांचा धाक दाखवत लुटायला सुरुवात केली. घरातील वृद्धांना त्यांनी ‘लक्ष्य’ केल्याचे दिसून येते. त्यासाठी पाळत ठेवूनच हा प्रकार होत असावा, असे या घटनेवरून दिसून येते. केत यांचे किराणा दुकान आहे. गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांनी दुकानासमोर साफसफाई केली. घरात गेल्यानंतर दबा धरून बसलेल्या चोरांना कापडाने त्यांचे तोंड दाबले आणि चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सव्वातोळ्याचे मिनी गंठण लंपास केले. आरडाओरड करेपर्यंत चोर पसार झाला. केत पती-पत्नी दोघेच राहतात. गुरुवारी पहाटे पती अरुण केत दुकानातील काही साहित्य आणण्यासाठी बाहेर पडले होते. जयश्री केत यांनी स्वच्छता दुकानाचे शटर खाली खेचले. त्यानंतर घरात गेल्या. दबा धरून बसलेला 25 ते 30 वर्षांचा असावा. त्याने चेहऱ्याला काळे कापड बांधले होते. त्याच्या हातातील पांढऱ्या ओढणीने त्याने जयश्री केत यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. केत यांनी प्रतिकार केला. त्या वेळी आरोपीने खिशातून चाकू काढला. जीवाच्या भीतीने केत गप्प झाल्या. त्यांच्या गळ्यातील 78 हजार रुपये किमतीचे 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेला. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चंदनशिवे करत आहेत. त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोराचा माग काढता आलेला नाही, असे ते म्हणाले. यापूर्वीचे चेन स्नॅचिंग… यापूर्वीच्या चेन स्नॅचिंग प्रकारात चोरांनी रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांना ‘लक्ष्य’ केले होते. दुचाकीवर डबलसीट येणारे चोर हेल्मेट वापरत होते. मागून येत चेन हिसकावली की, धूम ठोकायचे. परंतु शिवगंगा नगरातील प्रकारातील चोर वेगळे आहेत. यातील चोराने चेहरा काळ्या कापडाने झाकलेला होता. तो घरातच दबा धरून बसलेला असावा. आणण्यासाठी बाहेर पडले होते. जयश्री केत यांनी स्वच्छता दुकानाचे शटर खाली खेचले. त्यानंतर घरात गेल्या. दबा धरून बसलेला 25 ते 30 वर्षांचा असावा. त्याने चेहऱ्याला काळे कापड बांधले होते. त्याच्या हातातील पांढऱ्या ओढणीने त्याने जयश्री केत यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. केत यांनी प्रतिकार केला. त्या वेळी आरोपीने खिशातून चाकू काढला. जीवाच्या भीतीने केत गप्प झाल्या. त्यांच्या गळ्यातील 78 हजार रुपये किमतीचे 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेला. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चंदनशिवे करत आहेत. त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोराचा माग काढता आलेला नाही, असे ते म्हणाले. पाळत ठेवल्याचा संशय चोर ज्या अर्थी पहाटेच घरात दबा धरून बसला, त्याअर्थी त्याने या घरावर पाळत ठेवली होती. घरात कोण कोण आहेत, पहाटे किती वाजता उठतात, पती कधी बाहेर पडतो. या बाबी हेरूनच चोर परिसरात गेला. पती बाहेर गेले, पत्नी झाडू घेऊन बाहेर आल्या आणि चोर घरात शिरून दबा धरून बसला. पाळत ठेवूनच असा प्रकार करता येतो, असे पोलिस म्हणाले. चेहऱ्यावर काळ्या रंगाचे कापड घालून घरातच दबा धरून होता चोर जीवाच्या भीतीने केत गप्प झाल्या आणि चोराने त्यांच्या गळ्यातील गंठण घेतले.वयोवृद्ध किंवा महिला पहाटेच्या सुमारास लवकर उठल्यानंतर आसपास संशयित ये-जा करणाऱ्या प्रत्येकाच्या हालचालीवर लक्ष ठेवले पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काही चोरटे पाहणी करून निर्जन ठिकाणी दबा धरून बसतात. अचानक पाठीमागून येऊन झडप घालतात. काही कळण्याच्या आगोदर दागिने घेऊन लंपास होतात. अशा वेळी शक्य असल्यास घरात परिसरात किंवा दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून चोरट्याचा शोध घेता येईल.
Source link
वृद्धेचे तोंड दाबून चाकूच्या धाकाने सव्वा तोळ्याचे गंठण हिसकावले:शिवगंगा नगरमध्ये चेन स्नॅचिंगसाठी घुसले थेट घरात