Headlines

शहीद झालेल्यांच्या पुत्रांना पीएसआयपदी थेट नियुक्ती:‘गडचिरोली विशेष परिक्षेत्रात’ काम करण्याची अट




नक्षलविरोधी कारवाईत शौर्य गाजवताना वीरमरण आलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वारसांना महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. शहीद पोलिस उपनिरीक्षक संतोष महिपत घाग आणि शहीद पोलिस हवालदार हरिदास चिंतामण सयाम यांच्या वारसांना पोलिस उपनिरीक्षक गट-ब (अराजपत्रित) या पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश गृह विभागाने गुरुवारी जारी केला. नक्षलविरोधी कारवाईत शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना गट-अ आणि गट-ब संवर्गात नियुक्ती देण्याची तरतूद 1009 च्या शासन निर्णयानुसार आहे. याच तरतुदीचा आधार घेत, विराज संतोष घाग आणि विकास हरिदास सयाम यांची शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन त्यांना ही विशेष नियुक्ती देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणून ही नियुक्ती करताना त्यांना ‘गडचिरोली विशेष परिक्षेत्रात’ काम करण्याची अट घालण्यात आली आहे. एकूणच शहिदांच्या वारसांना यामुळे न्याय मिळाला आहे. शहिदांच्या त्यागाची दखल नक्षलविरोधी कारवायांमध्ये प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बलिदानाचा सन्मान करणे आणि त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर न सोडता सामाजिक सुरक्षा प्रदान करणे ही सरकारची मुख्य भूमिका आहे. ‘विशेष बाब’ म्हणून थेट ‘गट-ब’ अधिकारी पदावर नियुक्ती देऊन सरकारने एक संवेदनशील प्रशासकीय पाऊल उचलले आहे. कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या जवानांच्या कुटुंबाची जबाबदारी शासन घेते, हा सकारात्मक संदेश पोलिस दलात आणि समाजात पोहोचवणे हा या निर्णयाचा उद्देश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *