![]()
श्रीरामनवमी आणि उरूस उत्सवाच्या काळात पाणीवापर वाढल्याने श्रीरामपूर शहरावर पाणीटंचाईचे गडद संकट निर्माण झाले होते. साठवण तलावात केवळ दोन दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पालिकेची धाकधूक वाढली होती. मात्र, नगराध्यक्ष करण ससाणे यांनी पाटबंधा
.
भंडारदरा आणि निळवंडे धरणातून सुटलेले पाणी ओझरपर्यंत नदीपात्रातून आणि तिथून कालव्याद्वारे श्रीरामपूरला पोहोचते. उन्हाळ्यामुळे हे पाणी शहरात पोहोचायला किमान तीन दिवस लागतील. सुरुवातीचे गढूळ पाणी सोडून द्यावे लागत असल्याने प्रत्यक्ष साठा होईपर्यंत पाणीपुरवठा विभागाची मोठी कसरत होणार आहे.
पूर्वी शेती आणि पिण्यासाठी एकत्रित आवर्तन सुटत असे. मात्र, राजकीय वजन वापरून नेत्यांनी ही आवर्तने स्वतंत्र करून घेतली. परिणामी पाण्याचा अपव्यय वाढला असून ४५ दिवसांच्या आवर्तन चक्रामुळे साठवणुकीवर ताण येत आहे. नगरपालिका दररोज सुमारे दोन कोटी लिटर पाणी पुरवठा करीत आहे.सध्या एकच साठवण तलाव वापरात असल्याने जानेवारी फेब्रुवारी पर्यंत दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता. त्यानंतर सण उत्सव, यात्रा आणि उन्हाळा लक्षात घेता रोज पाणी पुरवठा केला जात होता. मिल्लतनगर तलावाचे काम सुरू असल्याने सध्या शहर एकाच तलावावर अवलंबून आहे. जोपर्यंत नवीन आवर्तनाचे पाणी तलावात पडत नाही, तोपर्यंत नागरिकांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे.
पाणी साठवणुकीचे गणित शहराला दररोज २ कोटी लिटर पाणी लागते, गोंधवणी येथील सिमेंट तलावात ३७५ दशलक्ष लिटर क्षमता, मिल्लतनगर येथील मातीच्या तलावाचे खोलीकरण व अस्तरीकरण सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर शहराची साठवण क्षमता १ हजार दशलक्ष लिटरवर जाईल.
दोन-तीन दिवसांत श्रीरामपूर शहरात पाणी येईल ^आम्ही पदभार स्वीकारताच पाटबंधारे विभागाचे ३ कोटी रुपये भरले आहेत. सध्या पालिकेची थकबाकी केवळ २ कोटी १ लाख असून, अतिरिक्त ९९ लाख रुपये आपल्याला परत मिळणार आहेत. गुरुवारी सायंकाळी आवर्तन सुटणार असून दोन-तीन दिवसात पाणी शहरात येईल.” – करण ससाणे, नगराध्यक्ष, श्रीरामपूर.