Headlines

संजय राऊत, पुतणा मावशीचं प्रेम दाखवू नका:तुमचा इथल्या यंत्रणेवर विश्वास नाही, मग पाकिस्तानची यंत्रणा नेमायची का? भाजपचा संजय राऊतांना सणसणीत टोला




अजित पवार यांच्या अपघाताचा आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. उलट सरकारकडून या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे. शरद पवारांपेक्षा संजय राऊत मोठे झाले का? असे संशयाचे वातावरण निर्माण केल्याने काहीही होणार नाही, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. संजय राऊतांनी कायद्याचे थोडेस ज्ञान घेतले पाहिजे, अपघात प्रकरणी एडीआरच दाखल होत असतो. दिशा सालियान प्रकरणी एडीआरच दाखल करण्यात आला होता, असेही बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, अजित पवार अपघात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करत तपास सुरू केला आहे. पवार कुटुंबियांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामध्ये संजय राऊत यांनी नाक खुपसू नये. सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना अजित पवार अपघात प्रकरणी काळजी आहे, तुम्ही पुतणा मावशीचे प्रेम दाखवू नका.चौकशीमध्ये जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईल. पण हा जर निव्वळ अपघात असेल तर कोणावर कारवाई करायची हा सुद्धा प्रश्न आहे. हा तपासाचा भाग आहे, त्यातून सत्य बाहेर येईल.तुमचा इथल्या यंत्रणेवर विश्वास नाही तुमचा पाकिस्तावर विश्वास आहे तिथली यंत्रणा नेमायची असेल तर आमची काही हरकत नाही. राऊतांनी दुटप्पी धोरण ठेवू नये नवनाथ बन म्हणाले की, अजित पवार अपघात प्रकरणी एफआयआर का दाखल होत नाही असा सवाल जनाब संजय राऊत यांच्याकडून विचारला जात आहे. या प्रकरणी एडीआर दाखल झालेला आहे. कोणताही अपघात झाला तर एडीआरच दाखल होतो. सुशांतसिंह राजपूत यांची संशयास्पद आत्महत्या, दिशा सालियानचा संशयास्पद मृत्यू झाला होता, त्या प्रकरणी तत्कालीन मविआ सरकारने एडीआरच दाखल केला होता, FIR दाखल केला गेला नव्हता. त्यावेळी संजय राऊत यांनी एफआयआर दाखल का केला नव्हता, असा सवाल बन यांनी केला आहे. राऊत तुम्हाला कायद्याचे ज्ञान नसेल तर ते घ्या, थोडा अभ्यास करा. कोणताही अपघात झाला तर एडीआर दाखल होतो त्यातूनच चौकशी होते. अजित पवार प्रकरणी एडीआर दाखल करत तपास सुरू आहे. एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. त्यामुळे दुटप्पी धोरण ठेवणे बंद करा. राऊतांकडे पुरावे असतील तर त्यांनी द्यावे नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्रात भाजप मोठा भाऊ आहे. अजित पवार अपघात प्रकरणामध्ये संपूर्ण चौकशी करण्याचे काम केले जात आहे. संजय राऊतांकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी ते पुरावे तपास यंत्रणाकडे द्यावे. विनाकारण भाजपचा कशामध्ये हात आहे का? असे संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे काहीही साध्य होणार नाही. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. शरद पवारांनी सांगितले की हा अपघात आहे.संजय राऊत शरद पवारांपेक्षा मोठे झाले आहेत का हा संशोधनाचा विषय आहे. ..काँग्रेसकडून उमेदवार देऊन विघ्न आणण्याचा प्रयत्न नवनाथ बन म्हणाले की, बारामती विधानसभा पोटनिवडणूक अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर होत आहे.त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची इच्छा ही निवडणूक बिनविरोध व्हावी. काँग्रेस जाणीवपूर्वक उमेदवार देऊन विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण सुनेत्रा पवारांचा विजय होणार हे निश्चित आहे. काँग्रेसने अपघाती मृत्यूनंतर होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा पाळावी. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतरही काँग्रेसने उमेदवार दिला अशी आठवणही त्यांनी करूण दिली. काँग्रेसने ही विनंती नाही ऐकली तर काँग्रेसला निश्चितपणे जनता धुडकावून लावल्याशिवाय राहणार नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *