Headlines

सिलिंडर मिळण्याआधी डिलिव्हरीचा संदेश:गॅस एजन्सींचा अजब कारभार, साठा दुप्पट तरीही तुटवडा का? विभागाची आकडेवारी कागदावरच‎



अमेरिका आणि इस्रायलने इराणशी पुकारलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून सुरू झालेला घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा अजूनही अमरावतीकरांची पाठ सोडायला तयार नाही. ग्राहकांना आजही रांगेत उभे राहूनच सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागत आहे.

.

कमी-अधिक प्रमाणात भारत, इन्डेन आणि एचपी या तिन्ही प्रकारच्या गॅस वितरकांच्या कार्यालयांसमोरचे हे चित्र आहे. संबंधित प्रतिनिधीने आज, गुरुवारी, सकाळच्या सत्रात काही वितरकांच्या कार्यालयांसमोर पाहणी केली. यावेळी काही ग्राहकांनी सिलिंडर मिळण्याआधीच त्यांना डिलीव्हरीचा संदेश आल्याची धक्कादायक माहिती दिली. यावर संबंधित गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याचे म्हणणे होते की बुकिंग झाल्यानंतर साधारणत: १२ दिवसांत सिलिंडर मिळेल. मात्र काही ग्राहक त्यापेक्षा जास्त काळ लोटल्यानंतरही सिलिंडर मिळालेच नाहीत, अशी तक्रार नोंदवत होते. उर्वरित, पान ४

मला केवायसीसाठी मागितले पैसे ^मी साईनगर भागातील गॅस एजन्सीचा ग्राहक आहे. मला सिलिंडर रिफील करून घ्यायचे आहे. मात्र मी केवायसी केली नाही, असे संबंधित एजन्सीचे म्हणणे आहे. त्यासाठी ३०० रुपयांची मागणी करण्यात आली. माझ्यासमोर एक महिला होती. तिचीही तशीच तक्रार होती. महिलेकडे तेवढीच रक्कम होती. परंतु घरी ये-जा करण्यासाठी पैसे शिल्लक राहायला हवे, म्हणून तिच्याकडून २०० रुपये घेण्यात आले. पैसे नसल्यामुळे मला मात्र परत फिरावे लागले. – संदीप मोरस्कर, म्हाडा कॉलनी, अमरावती.

रांगांनी प्रशासनाच्या माहितीला पूर्णपणे खोडून काढले जिल्ह्यात आयओसीचे सर्वाधिक २५, बीपीसीएलचे १७ आणि एचपीसीएलचे १४ गोदाम आहेत. अशाप्रकारे एकूण ५६ गोदामे मिळून दररोज २४ हजार ५७४ सिलिंडर साठवले जातात. एकूण साठवण क्षमता ही रोजच्या वापराच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे रोजच्या आवश्यकतेएवढे सिलिंडर ग्राहकांना निश्चितच पुरविले जात आहेत. परंतु गॅस वितरकांच्या कार्यालयांसमोर कायम असलेल्या रांगांनी प्रशासनाच्या या माहितीला निकषांच्या आधारे खोडून काढले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *