Headlines

खा. संजय राऊत, खा. संजय पाटील यांनी अक्षरश: पातळी सोडली:संजय विरुद्ध संजय शिवीगाळीने महाराष्ट्राची मान शरमेने खाली




उद्धवसेनेचे खा. संजय राऊत आणि शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. या शिवीगाळीने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. आधी खा. राऊत यांनी बंडखोर खासदारांना तुडवणार असे म्हणत शिव्यांचा वापर केला. त्यावर खा. पाटील यांनी शिव्या देत ‘माझ्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना घरात घुसून मारणार. बॉम्बने ‘उडवणार’, असे म्हटले. पत्रकारांनाही धमकावले. राऊत यांनी पाटील यांच्याविरुद्ध पोलिसात धाव घेतली. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंनी नाराजी व्यक्त केल्यावर पाटील यांना पत्रकारांविषयीच्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली. मी तुमचे खूप दिवस सहन केले, प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते : संजय पाटील पत्नी, वडील, मुलीबद्दल वारंवार एकच प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर संजय दिना पाटील भडकले. ते म्हणाले की, मी तुमचे खूप दिवस सहन केले. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. उगाच माझ्या डोक्यात जाऊ नका! मी तुम्हाला जेवायला देतोय, हे विसरू नका. गद्दारांविरुद्ध तुडवा आंदोलन, शरद पवारांच्या मदतीने राडा करणार : राऊत उद्धवसेनेच्या ६ खासदारांनी बंड पुकारल्यावर संजय राऊत दिल्लीत म्हणाले होते की, आम्ही गद्दारांविरोधात “ऑपरेशन तुडवा’ सुरू करत आहोत. शरद पवारांच्या मदतीने बंडखोरांच्या मतदारसंघात राडे करू. पाटील यांचा शिवसैनिक हिशेब पूर्ण करतील. ही २०२९ लोकसभेची तयारी राजकीय विश्लेषकांच्या मते खा. संजय राऊत आणि संजय दिना पाटील यांच्यातील वाद म्हणजे २०२९ च्या लोकसभेची तयारी आहे. कारण दोन वर्षांनंतर होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत निवडून येण्याची खात्री खा. राऊत यांना नाही. त्यामुळे ते २०२९ मध्ये ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. स्वत:ला शक्य झाले नाही तर ते भावाला मैदानात उतरवू शकतात. दुसरीकडे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-महायुतीचे उमेदवार म्हणून संजय दिना पाटील यांनाच उमेदवारी मिळेल आणि त्यांना निवडून आणू, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *