Headlines

HRS Aluglaze Secures ₹26.94 Cr Orders, Stock Surges 175%


3 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

ॲल्युमिनियम उत्पादनांचे डिझाइन आणि निर्मिती करणाऱ्या क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘एचआरएस अलुग्लेज लिमिटेड’ने (HRS Aluglaze Ltd) मोठी झेप घेतली आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल करणारी कामगिरी केली आहे. कंपनीला विविध नामांकित कॉर्पोरेट कंपन्यांकडून तब्बल 26.94 कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर्स मिळाल्या आहेत. यामुळे कंपनीच्या भविष्यातील वाढीला मोठी गती मिळणार आहे.

एचआरएस अलुग्लेज लिमिटेडला मिळालेल्या एकूण ऑर्डर्समध्ये ‘सफल गोयल रियल्टी एलएलपी’ (Safal Goyal Realty LLP) कडून मिळालेल्या 10.19 कोटींच्या महत्त्वाच्या ऑर्डरचा समावेश आहे. यात ॲल्युमिनियम खिडक्या, ग्लास रेलिंग आणि फॅब्रिकेशनच्या कामाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, केईसी इंटरनॅशनल लिमिटेडकडून 7.23 कोटी, आर्यन बिल्ड प्रोजेक्ट्सकडून 6.59 कोटी आणि पीएसपी प्रोजेक्ट्स लिमिटेडकडूनही महत्त्वाच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. या सर्व ऑर्डर्स आगामी 3 ते 12 महिन्यांत पूर्ण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

गुंतवणूकदारांना मालामाल करणारी कामगिरी डिसेंबर 2025 मध्ये 96 रुपये प्रति शेअर या दराने आलेला कंपनीचा आयपीओ (IPO) गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरला आहे. 9 एप्रिल 2026 रोजी कंपनीचा शेअर 264 रुपयांवर ट्रेड करत होता. म्हणजेच आयपीओच्या किमतीपेक्षा तो 175 टक्के वाढला आहे.

अहमदाबादमध्ये नवीन उत्पादन प्रकल्प उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कंपनीने गुजरातच्या अहमदाबादमधील राजोडा येथे नवीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी उभारण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी साधारण 16 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, आगामी 15 महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होईल. यासाठी कंपनीने ‘चावडा इन्फ्रा लिमिटेड’सोबत करार केला आहे.

व्यवसाय विस्तार आणि नवीन उपकंपनी कंपनीने आपले कार्यक्षेत्र विस्तारण्यासाठी जिओट्रिक्स बिल्डिंग एनव्हलप प्रायव्हेट लिमिटेडसोबत व्यवसाय संपादनाचा करार केला आहे. यामुळे कंपनीला टर्नकी फॅसाड सोल्यूशन्स आणि डिझाइन इंजिनिअरिंग क्षेत्रात मोठी पकड मिळवता येईल. तसेच, 10 फेब्रुवारी 2026 रोजी कंपनीने जिओट्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही नवीन उपकंपनी देखील स्थापन केली आहे.

व्यवस्थापकीय संचालक रुपेश शाह यांनी सांगितले, की आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कंपनीचे एकूण उत्पन्न 42.14 कोटी रुपये इतके होते, तर 5.15 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतही (H1FY26) कंपनीने 26.35 कोटींच्या उत्पन्नासह 4.54 कोटींचा नफा नोंदवला आहे.

नवीन ऑर्डर्समुळे ॲल्युमिनियम आणि फॅसाड सोल्यूशन्स क्षेत्रात आमचे स्थान अधिक भक्कम झाले आहे. नवीन उत्पादन प्रकल्प आणि धोरणात्मक अधिग्रहणामुळे आम्ही वाढत्या मागणीनुसार सेवा देण्यास सज्ज आहोत,असेही रुपेश शाह यांनी सांगितले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *