Headlines

अमित शहा, फडणवीस अन् शिंदे एकदिलाने काम करतात:महायुतीत राष्ट्र प्रथम; उबाठामध्ये मात्र गटबाजीच गटबाजी, ठाकरेंचा दौरा म्हणजे वरातीनंतर घोडे- भाजप




महायुतीमध्ये अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राष्ट्र प्रथम या भूमिकेतून एकदिलाने काम करत आहेत. महायुतीमध्ये अंतर्गत गटबाजी नाही. उलट उबाठा गटामध्ये विविध नेत्यांमध्ये मतभेद आणि संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. महायुतीचा अजेंडा महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास आहे, तर विरोधकांचा अजेंडा केवळ सत्तेचे राजकारण आहे, असे भाजनप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावित खासदार मतदारसंघ दौऱ्यांवर टीका करत म्हटले की, हा दौरा म्हणजे वरातीनंतर घोडे” काढण्यासारखा प्रकार आहे. वर्षभर जनतेमध्ये न जाता, घरात बसून राजकारण करणाऱ्यांना आता दौरे करून जनतेचा विश्वास मिळवता येणार नाही. जनतेने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला आधीच नाकारले आहे. संजय राऊत यांच्या सततच्या बेताल वक्तव्यांमुळे आणि जनतेपासून तुटलेल्या नेतृत्वामुळे उबाठा गटाची विश्वासार्हता संपली आहे. त्यामुळे असे दौरे काढून राजकीय पुनरुज्जीवन होणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे. उबाठाने स्वतःच्या राजकीय भूमिकेचे स्पष्टीकरण द्यावे नवनाथ बन म्हणाले की, अमित शहा कोणता पक्ष चालवतात यावर भाष्य करण्यापेक्षा उबाठा गटाने स्वतःच्या राजकीय भूमिकेचे स्पष्टीकरण द्यावे. त्यांच्या मते, उबाठा गट काँग्रेसच्या आधारावर राजकारण करत असून राहुल गांधींच्या भूमिकेचे समर्थन करण्याचेच काम सातत्याने करत आहे. स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करण्याऐवजी काँग्रेसच्या अजेंड्यावर चालणारे राजकारण महाराष्ट्रातील जनतेने ओळखले आहे, असा दावा त्यांनी केला. ठाकरे-राऊतांनी आत्मपरीक्षण करावे नवनाथ बन म्हणाले की, खासदार आणि आमदारांना “गद्दार” म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. लोक पक्ष का सोडून जात आहेत, याचा विचार त्यांनी करावा. सततची शिवीगाळ, जनतेपासून दुरावा आणि नकारात्मक राजकारण यामुळेच अनेक नेते उबाठा गटापासून दूर गेले. जनतेच्या विरोधात वागून, लोकांना भेटण्याऐवजी स्वतःच्या सहकाऱ्यांनाच दोष देण्याचे राजकारण आता संपले पाहिजे. येत्या काळात आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्तेही उबाठा गटासोबत राहणार नाहीत. हिंदूंच्या श्रद्धांचा अवमान जनता स्वीकार करणार नाही नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेसने रामसेतूवर प्रश्न उपस्थित केले, उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर आंदोलनाची खिल्ली उडवली आणि आता संजय राऊत यांनी पुष्पक विमानाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. हिंदूंच्या श्रद्धांबाबत वारंवार अवमानकारक भूमिका घेणे योग्य नाही. हिंदूंच्या श्रद्धांचा अवमान करण्याचे राजकारण जनता स्वीकारणार नाही. राम मंदिर ट्रस्ट संदर्भात ज्या कथित अनियमिततेची चौकशी सुरू आहे, त्यात कायद्यानुसार कारवाई व्हावी, अशीच आमची भूमिका आहे. विश्वासघात करणाऱ्यांवरच गद्दारीचा शिक्का नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्रात गद्दार आणि खुद्दार कोण, याचा निर्णय जनतेने विधानसभा निवडणुकीत दिला आहे. 2019 मध्ये महायुतीच्या नावाने मत मागून नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करणे हा जनादेशाशी विश्वासघात होता, असा आरोप त्यांनी केला. याच कारणामुळे 2024 मध्ये मतदारांनी उबाठा गटाला नाकारल्याचा दावा त्यांनी केला. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला जनतेने पुन्हा संधी दिली. त्यामुळे “गद्दारी”चा आरोप इतरांवर करण्यापेक्षा स्वतःच्या राजकीय निर्णयांचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *