Headlines

आत्मकल्याण अन् स्वत:च्या हिताचा विचार करणारा मनुष्य शहाणा:हभप रामभाऊ महाराज राऊत, नेवासा तालुक्यातील निंभारीत हरिनाम सप्ताहास भाविकांची गर्दी‎




केवळ शास्त्रज्ञान, उच्च शिक्षण किंवा मोठे पद मिळवणे यावरून मनुष्य शहाणा ठरत नाही. जो स्वतःच्या खऱ्या हिताचा आणि आत्मकल्याणाचा विचार करतो, तोच खऱ्या अर्थाने शहाणा असतो, असे प्रतिपादन रामभाऊ महाराज राऊत यांनी केले. नेवासा तालुक्यातील निंभारी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने सहाव्या दिवशी रामभाऊ महाराज राऊत यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराजांनी “देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज” हा अभंग घेऊन अत्यंत परखड व हृदयस्पर्शी अध्यात्मिक विवेचन केले. देहाभिमान विसरून आत्मज्ञानाकडे वळणे हाच खरा स्वहिताचा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनुष्य देहाच्या मोहात अडकतो; मात्र देहाचा विसर पडल्यावरच खरा आत्मिक आनंद आणि समाधान प्राप्त होते, असे त्यांनी विविध उदाहरणांतून पटवून दिले. संत महात्मेच आपल्याला खऱ्या हिताचा मार्ग दाखवतात. त्यामुळे नामस्मरण, भजन आणि संतसंग यांना जीवनात महत्त्वाचे स्थान द्यावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित भाविकांना केले. दरम्यान, रामभाऊ महाराज राऊत यांची कीर्तन सेवा सात व आठ तारखेलाही होणार असून भाविकांना त्यांच्या ओजस्वी वाणीतील सखोल अध्यात्मिक विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. अखंड हरिनाम सप्ताहामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभत आहे. याप्रसंगी हभप देविदास महाराज म्हस्के, हभप भगवान महाराज जंगले, हभप नंदकिशोर महाराज खरात, हभप रामनाथ महाराज पवार, हभप आदिनाथ महाराज भोगे, हभप गणेश महाराज आरगडे, हभप श्रीहरी महाराज वाकचौरे, हभप सागर महाराज टेमक, हभप ऋषिकेश महाराज वाल्हेकर यांच्यासह अनेक महाराज मंडळी उपस्थित होती. पंचक्रोशीतील भजनी मंडळ, तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व विठ्ठल-रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र, गोणेगाव चौफुला येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अखंड हरिनाम सप्ताहामुळे परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. कीर्तनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे परिसरात नवचैतन्य निर्माण झाले आहे. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप होत आहे. त्यामुळे या सोहळ्याप्रसंगी मोठ्या प्रमाणात अन्नदान होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *