भालके, सावंत उद्या ‘धनुष्यबाण’ हाती घेणार:विकासकामांसाठी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय; उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील दोन बडे नेते भगीरथ भालके आणि अनिल सावंत उद्या, १२ एप्रिल रोजी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे . श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा येथे कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या…