Headlines

हिंगोली फटाके गोदाम प्रकरणी महसूल अधिकारी जबाबदार:विजय वडेट्टीवारांचा आरोप, छत्रपती संभाजीनगरात मोर्चाचा इशारा




हिंगोलीतील फटाके गोदामाला लागलेल्या आगीच्या घटनेसाठी महसूलचे अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या संदर्भात आपण अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. हिंगोली येथील सराफ सभागृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी सचिन नाईक, जिल्हाध्यक्ष डॉ. सतीष पाचपुते, सुरेश सराफ, भगवान खंदारे, शामराव जगताप, बंटी नागरे, शेख जुबेर यांची उपस्थिती होती. यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, दिवाळीच्या कालावधीत फटाक्यांचा परवाना दिल्यानंतर त्यांनी विक्री न झालेला साठा कुठे ठेवला त्याची वेळोवेळी तपासणी करणे आवश्‍यक आहे. मात्र महसूल विभागाने यामध्ये लक्ष दिले नाही त्यामुळेच हा दुर्देवी प्रकार घडला आहे. या प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसून येत असून त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. या संदर्भात आगामी हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. हिंगोली जिल्हयात फायनांन्स कंपन्यांकडून कर्जफेडीसाठी तगादा लावला जात असल्याचे दिसून आले आहे. शासनाने या कंपन्यांकडून मी शेतकऱ्यांना कर्जासाठी फोन करणार नाही त्यांच्याकडे तगादा लावणार नाही असे लिहून घेतले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. हिंगोलीत शेतकऱ्यांना पिककर्ज वाटपास टाळाटाळ होत असल्याच्या प्रश्‍नावर त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवर टिकेची झोड उठवली. हिंगोली एवढे अंधःकारमय वातावरण कुठेही पाहिले नाही. लोकप्रतिनिधी कामाचे राहिलेले नाहीत त्यामुळेच शेतकऱ्यांना या परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. धरण हिंगोली जिल्हयात अन पाणी दुसऱ्या जिल्हयात महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राहिलेलीच नाही. रोज खुन, दरोडे, अत्याचाराच्या घटना घडत आहेत. पोलिस अन सत्ताधारी गुन्हेगारांशी हातमिळवणी करीत असतील तर कायद्याचा धाक कसा राहणार असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. विज कंपनीच्या कारभारावरही त्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. धरण हिंगोली जिल्हयात अन पाणी दुसऱ्या जिल्हयात अशी परिस्थिती असून लोकप्रतिनिधी हिंगोलीत मते मागायला आल्यानंतर त्यांना जाब विचारला पाहिजे असे त्यांनी सांगितले. हिंगोली जिल्हयातील प्रशासन सुस्त अन मस्तवाल झाले असून सत्तेतील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या कमीशनखोरीतून हिंगोलीची लुट करीत आहेत. अधिकारी व लोकप्रतिनिधी एकमेकांचे दबेल असल्यामुळेच ते विरोधात बोलू शकत नाहीत असा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला. जिल्हयाच्या प्रश्‍नांवर आपणच लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा काढणार राज्यातील दुष्काळी परिस्थितीत होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर झाली पाहिजे. या मागणीसाठी लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. शेतकऱ्यांना आधार दिल्या शिवाय मागे हटणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. हेही वाचा.. हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई: पाच जणांवर गुन्हा, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त हिंगोली शहरात तसेच लगतच्या नवीन वसाहतीमध्ये अवैधरित्या फटाके साठवून ठेवलेल्या पाच गोदामांवर छापे टाकण्यात आले आहे. यामध्ये सुमारे 3 लाख रुपयांचा फटाक्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांवर हिंगोली शहर तर एका जणांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *