Headlines

हिंदू जनजागृती समितीतर्फे जिल्ह्यात 15 ठिकाणी सामूहिक “गदापूजन’:युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी घेतले जात आहेत कार्यक्रम‎

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने “रामराज्य स्थापनेसाठी” देशभरातील विविध शहरांसह जिल्ह्यातील १५ ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ सोहळा उत्साहात संपन्न झाला. सोहळ्यात हिंदू जनजागृती समितीचे अमोल वानखडे म्हणाले की, इतिहासाचे अवलोकन केल्यास असे लक्षात येते की, ज्य . ​​चांगेफळ बुलडाणा येथील जुना आखाड्याचे महंत रामभारती यांनी, बाळापूरच्या सिद्ध तपे हनुमान मंदिरात हे पूजन करताना गदा पूजानाचे महत्व विषद…

Read More

अदिती तटकरेंच्या खात्याच्या रचनेत मोठा बदल:तब्बल २३ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विभागाचे सक्षमीकरण, हजारो पदांच्या पुनर्चनेला मान्यता

महायुती सरकारने तब्बल २३ वर्षांनंतर राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सक्षमीकरणाचा निर्णय घेतला आहे. सरकारने या अंतर्गत प्रस्तुत खात्याच्या हजारो पदांच्या पुनर्रचनेला मान्यता दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे विभागाच्या कामकाजास मोठी गती मिळेल, असा ठाम विश्वास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे शनिवारी याविषयी एका विस्तृत पोस्टमध्ये…

Read More

कलाकारांना धमकावण्यापेक्षा बाळासाहेबांचा इतिहास वाचा:कुणाल कामराचे मंत्री प्रताप सरनाईकांना मार्मिक प्रत्युत्तर

प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या एका विडंबन गीतानंतर सुरू असलेल्या हक्कभंग प्रकरणावरून राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामराला इशारा दिला होता. या इशाऱ्याला कामराने सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्मिक उत्तर दिले असून, थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाचा दाखला दिला आहे….

Read More

भागवत कथेच्या माध्यमातून जीवन आदर्श बनवा- सुजीत महाराज देशमुख:हातरूण येथे जय हनुमान मित्र मंडळ व नर्मदेश्वर संस्थानतर्फे आयोजन‎

भागवत धर्मात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा उत्तम संगम आहे. भक्ती, नामस्मरण आणि सत्संगामुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि मनात सात्विक विचारांचा प्रवाह वाढतो. अहंकार गेल्याशिवाय माणसाला खरी शांती मिळत नाही. कलियुगात भक्तीला “श्रेष्ठ मार्ग’ मानले गेले आहे, असे प्रतिपादन भागवताचार्य सुजीत महाराज देशमुख यांनी केले. ते बाळापूर तालुक्यातील हातरूण येथील जय हनुमान मित्र मंडळ…

Read More

मराठवाडा हादरला! हिंगोलीत 4.7 रिश्टरचा भूकंप:सकाळीच पांगरा शिंदे गावाजवळ भूकंपाचे तीव्र धक्के, नांदेड-परभणीतही जाणवले कंप

मराठवाडा परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी 8 वाजून 47 मिनिटांनी हिंगोली जिल्ह्यात भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 इतकी नोंदवली गेली आहे. अचानक बसलेल्या या धक्क्यामुळे नागरिक काही काळ घराबाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. भूकंप हिंगोली जिल्ह्यातील औंढानागनाथ परिसरात झाल्याची माहिती सर्वप्रथम समोर…

Read More

नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण:2090 पर्यंत हिंदू अल्पसंख्याक होतील की काय? पुण्यातील आयटी कंपन्यांचेही ऑडिट करा- गोपीचंद पडळकर

नाशिकच्या आयटी कंपनीमध्ये जो प्रकार घडला तो इतर कंपन्यामध्ये घडतो का याकडे लक्ष दिले पाहिजे. नाशिक हे काय आयटी हब नाही. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या आहेत. या घटनेनंतर कुठे असे प्रकार घडत आहेत का याचा शोध घेतला पाहिजे, असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाशिकमधील कॉर्पोरेट जिहादबद्दल बोलताना म्हटले आहे. नाव बदलून मुलींना फसवण्याचे…

Read More

दोन्ही राष्ट्रवादी एकच असण्याचं कारण वेगळं, वेळ आल्यावर बोलेन:सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला शरद पवार जातीलच- नाना पटोले

अजित पवार आणि शरद पवार हे काही वेगळे नाही ते एकत्रितच आहे हे मी अनेकदा सांगितले आहे. ते कौटुंबिक आहेत, सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला शरद पवार जातीलच, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होतो तेव्हाही हेच बोलत होतो, ज्यावेळी राष्ट्रवादीचे विभाजन झाले त्यावेळी सुद्धा मी हेच बोलत होतो कारण ते…

Read More

खरातच्या जागी मुस्लिम असता तर वरात काढली असती:नालायकाला नालायक म्हणायची हिंमत ठेवा, विजय वडेट्टीवारांनी सुनावले खडे बोल

नाशिकमधील आयटी कंपनीत समोर आलेले ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरण आणि भोंदू बाबा अशोक खरात याच्यावरील कारवाईवरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी आणि प्रशासकीय यंत्रणेवर सडकून टीका केली आहे. अशोक खरातच्या जागी जर एखादा मुस्लिम असता, तर आतापर्यंत अख्या मुसलमानांची वरात काढली असती, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय…

Read More

नवऱ्याने शिक्षिका पत्नीला सुपारी देऊन संपवले:गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांचे कथित अभय; CBI चौकशीसाठी केंद्रीय मंत्र्याचे CM ला पत्र

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी एका शिक्षिकेच्या हत्येच्या सीबीआय चौकशीसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या शिक्षिकेची तिच्याच नवऱ्याने सुपारी देऊन हत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह इतर दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. पण आता चक्क केंद्रीय मंत्र्यानेच या घटनेतील इतर आरोपींना पोलिस अभय देत असल्याचा आरोप करत थेट सीबीआय…

Read More

इफ्तार पार्ट्यांमध्ये सहभागी होताना धर्मांधता दिसत नाही का?:शरद पवार यांच्या वारकरी संप्रदायावरील वक्तव्यावर तुषार भोसलेंचा पलटवार

वारकरी संप्रदायाबाबत राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित स्मरणिकेत त्यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या मते, संप्रदायातील सुमारे 60 टक्के लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचे दिसून येते….

Read More