Headlines

महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांना वेग:छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी अनेक भागांत दुरुस्ती

येत्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन होणार असल्याने, महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळात मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्ती कामांना वेग आला आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज उपकेंद्रांतील आणि वीजवाहिन्यांवरील यंत्रणेची दुरुस्ती केली जात आहे. या कामांसाठी शुक्रवारी अनेक भागांत वीजपुरवठा खंडित करून दुरुस्ती करण्यात आली. पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी, वीजपुरवठा खंडित होणे टाळण्यासाठी आणि विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना…

Read More

वेरूळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात होणार साजरी:बॅनर ओपनिंग आणि डीजेच्या गजरात भीम सैनिकांचा उत्सव

छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वेरूळमध्ये भीम सैनिक मित्र मंडळाच्या वतीने उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बॅनर ओपनिंग आणि डीजेच्या गजरात भीम सैनिकांनी बाबासाहेबांना अभिवादन करत जयंती साजरी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी वेरूळमध्ये मोठा बॅनर उभारण्यात आला. बॅनर ओपनिंग सोहळा डीजेच्या गजरात…

Read More

‘तो खुर्चीजवळ माझ्या अंगाला स्पर्श होईल असा उभा होता..’:कॉर्पोरेट जिहाद, पीडित तरुणीने सांगितली आपबिती

मला वाटलं होतं की ही मोठी, बहुराष्ट्रीय आयटी कंपनी आहे. तिथे आपल्यासाठी चांगल्या कामाचे वातावरण असेल. पण हळूहळू लक्षात आले की तिथे कामापेक्षा माझा धर्म आणि माझ्या विचारांबद्दल जास्त बोललं जातंय. माझ्या मनात माझ्याच धर्माबद्दल द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात ‘जिहाद’पेरला जात असल्याचे वेळीच लक्षात आलं. एवढंच नव्हे तर तौसिफ अत्तार नावाचा…

Read More

पारनेर बाजार समिती सभापतिपदी बेलकर:उपसभापतिपदी संदीप सालके बिनविरोध

पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी गंगाराम बेलकर तर उपसभापतिपदी संदिप सालके यांची बिनविरोध निवड झाली.मावळते सभापती किसनराव रासकर आणि उपसभापती किसनराव सुपेकर यांनी आपले राजीनामे दिल्याने, गुरुवारी (९ एप्रिल) पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. बाजार समितीच्या सभागृहात, सहायक निबंधक तथा अध्यासी अधिकारी विकास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक…

Read More

तांदुळवाडी जि. प. शाळेत चिमुरड्यांच्या प्रतिभेला बहर:जिल्हा परिषद शाळाच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचा पाया, शिक्षण विस्तार अधिकारी देवरे‎

राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थित पालक आणि ग्रामस्थांची मने जिंकली. या . कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी, राहुरी पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी इंदुमती देवरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, अशा प्रकारचे सांस्कृतिक व्यासपीठ…

Read More

केंद्रीयमंत्री डॉ. मांडवियांच्या हस्ते 'जन सेहत सेतू'चे लोकार्पण:'निरोगी भारत' संकल्पनेसाठी आरोग्य क्षेत्राची मोठी जबाबदारी: डॉ. मांडविया

केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ‘निरोगी भारत, समृद्ध भारत व विकसित भारत’ या संकल्पनेसाठी आरोग्य क्षेत्राची मोठी जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. वैद्यकीय व्यावसायिकांसह प्रत्येकाने यात योगदान देणे आवश्यक आहे. त्यांनी ‘जन सेहत सेतू’ आरोग्य शिबीर कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले, जिथे महिन्यातून एक दिवस मोफत आरोग्य तपासणी व उपचार उपलब्ध करून…

Read More

आठवड येथील यात्रा उत्सवात हजारो भाविकांची गर्दी:धार्मिक अन् सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, ग्रामदैवताच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा‎

तालुक्यातील आठवड येथील ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ७ एप्रिल रोजी पहाटे गावातील तरुणांनी पैठण येथून कावडीने पायी आणलेल्या . ८ एप्रिलला १० ते १२ या वेळेत कलाकारांची हजेरी कार्यक्रम झाला. त्यानंतर भाविकांसाठी वांगे-भाकरीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते. दुपारी…

Read More

इतिहासाशी छेडछाड खपवून घेणार नाही, मराठा साम्राज्याचा नकाशा समाविष्ट करा:मराठा महासंघाचा प्रशासनाला इशारा; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन‎

शालेय अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांना निवेदन देण्यात आले. इतिहासाशी केलेली छेडछाड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा यावेळी महासंघाने दिल . शालेय पुस्तकांत मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत आणि स्पष्ट स्वरूपात द्यावा. डिजिटल माध्यमांद्वारे (QR कोड) नकाशाची सविस्तर माहिती उपलब्ध करून द्यावी….

Read More

प्रशासन सतर्क:चुर्मापुरीतील पुतळे कारखाना अतिक्रमण काढणार, विना परवानगी पुतळा बसवल्यास थेट जेलची हवा

मोडनिंब येथील दोन्ही महापुरुषांचे पुतळे ग्रामस्थांनी स्वखुशीने गुरुवारी सायंकाळी सुरक्षित स्थळी हलवले. दरम्यान पुतळे उभा करणारा कोठडीतील मास्टरमाइंड बाळराजे आवारे पाटील याचा चुर्मापुरी (ता.अबंड, जि.जालना) येथील पुतळा तयार करण्याच्या कारखान्याचे अतिक्रमण करुन थाटलेले पत्राशेड हटवण्याचे आदेश तेथील प्रांताधिकारी उमाकांत पारधी यांनी दिले आहेत. महापुरुषांचे पुतळे विना परवानगी रातोरात उभे करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण…

Read More

धार्मिक:रामनाम मानवी जीवाला विसावा देणारे ठिकाण, वटवृक्ष मंदिरात पुण्यतिथीच्या धर्मसंकीर्तन महोत्सवात गाडगीळ यांचे निरुपण‎

अक्कलकोट10 तासांपूर्वी कॉपी लिंक अक्कलकोट मानवी जिवाला विसावा देणारं ठिकाण म्हणजे रामनाम असल्याचे निरुपण कल्याण येथील हभप गणेश बुवा गाडगीळ यांनी केले. ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आयोजित श्री.स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील कीर्त Source link

Read More