Headlines

मल्लिकार्जुन अन् पाचपीर देवाच्या यात्रेला सुरुवात:बोरेगांव यात्रेमुळे हिंदू- मुस्लिम समाजात एकोपा‎

अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन व पाचपीर देवाच्या यात्रेस गुरुवारपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे. गुरुवारी श्री मल्लिकार्जुन देवास रुद्राभिषेक घालण्यात आले. त्यानंतर मूर्तीला १०८ बिल्व अर्पण करण्यात आले आहे. पाचपीर देवास गलिपधारण करण्यात आले आहे. त्यानंतर मज्जलसी हा मुख्य धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता पाचपीर देवास…

Read More

संतोष देशमुखांच्या हत्येची तक्रार मागे घ्या!:आरोपींचा धनंजय देशमुखांना प्रस्ताव, जेलमधून बाहेर आलेल्या दादासाहेब खिंडकरांचा दावा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर हे तब्बल 13 महिन्यांच्या कारावासानंतर अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. एका तरुणाला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता, ज्यासाठी त्यांना वर्षभरापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावे लागले. कारागृहातून सुटका झाल्यानंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी, पुष्पगुच्छ आणि ओवाळणी करत…

Read More

पूर्णा नदीवर अडीच कोटीतून उभारणार घाट:आ. सावरकरांच्या हस्ते भूमिपूजन

म्हैसांग येथे पूर्णा नदीवर आमदार रणधीर सावरकर यांच्या अडीच कोटी रुपयांच्या विशेष विकास निधीतून घाट उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आ. रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी अकोला व अमरावती जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने पूर्णा नदीवर येतात. पूर्णा नदीवर दशक्रिया, अस्थी विसर्जन आदी विधी सुद्धा पार पडतात. भाविकांच्या मागणीची दखल घेत…

Read More

अशोक खरात प्रकरणात मोठा गौप्यस्फोट:160 जीबी डिजिटल पुरावे, A, B, C कोडवर्ड मधून काळे कारनामे उघड; प्रकरणात मोठी घडामोड

नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता धक्कादायक तपशील समोर येत आहेत. तपास यंत्रणांनी 160 जीबी इतका डिजिटल डेटा जप्त केला असून, या पुराव्यांमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. फॉरेन्सिक तपास पूर्ण करून हा अहवाल विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सादर करण्यात आला आहे. या नव्या पुराव्यांमुळे खरात यांच्या भोवतीचा कायदेशीर फास अधिक घट्ट होत…

Read More

सहकार भारतीमुळे सहकार चळवळीला नैतिक अधिष्ठान:विद्याधर अनास्कर यांचे मत, तीन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन

पुणे येथे सुरू झालेल्या तीन दिवसीय ‘सहकार महोत्सवा’च्या उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सहकार भारतीमुळे सहकार चळवळीला नैतिक अधिष्ठान लाभले असल्याचे मत व्यक्त केले. सहकार क्षेत्राला लाभलेल्या सहकार भारतीच्या नेतृत्वामुळे ही चळवळ सर्वार्थाने प्रगती करत असल्याचेही ते म्हणाले. सहकार भारती पुणे विभाग आणि अस्तित्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन…

Read More

पुणे मध्यभागात पोलिसांची झाडाझडती:सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्या 40 जणांवर कारवाई; अमली पदार्थ सेवनावर नियंत्रण

पुणे शहराच्या मध्यभागातील डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, तसेच विश्रामबाग, खडक, समर्थ आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुरुवारी रात्री पोलिसांनी विशेष झाडाझडती मोहीम राबवली. या कारवाईत बेकायदा प्रकार करणाऱ्या 40 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. फरासखाना, समर्थ, खडक, विश्रामबाग, डेक्कन आणि शिवाजीनगर पोलीस…

Read More

वाहनाच्या धडकेत बिबट्याचा तडफडून मृत्यू:बचाव पथक उशिरा पोहोचले, तिवसा जवळ महामार्गावरील घटना‎

रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची बिबटाच्या बछड्याला जोरदार धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेला हा बछडा घटनास्थळीच दोन ते तीन तास तडफडत राहिला. अखेर वन विभागाच्या शेड्यूल १ बचाव पथकाने घटनास्थळी पोहचून जखमी बिबटावर पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने प्राथमिक उपचार केले. या बिबट्याला तातडीने नागपूर येथे पाठवण्यात आले. परंतु, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. बचाव पथक…

Read More

धरणाचे पाणी कोरडवाहू शेतकऱ्यांना का दिले नाही:उपाययोजनेची गरज, प्रा. विधळे यांच्या गौरव समारंभात ज्येष्ठ विचारवंत डॉ. पाटणकर यांचा सवाल‎

कोरडवाहू शेती हा अत्यंत अडचणीचा विषय आहे. सिंचनाची सोय नसणे ही त्यांच्यापुढील सर्वात मोठी अडचण असते. त्यामुळे बरेचदा असे शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. शासन त्यांना धरणाचे पाणी का देत नाही, असा सवाल उपस्थित करून शासनाने योग्य ती उपाययोजना . प्रकल्पग्रस्तांची व्यथा मांडताना डॉ. पाटणकर पुढे म्हणाले, विकास प्रकल्पांखाली अनेक गावे आणि शेतजमिनी जातात. अनेकजण…

Read More

शिंदखेड्यातून नाशकात चोरटी वाळू वाहतूक:6 डंपरसह मुरुमाचे 2 ट्रॅक्टर जप्त, सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांची छापेमारी

शिंदखेड्याच्या तापी नदीतून अवैधरित्या उपसा करून 30 ब्रास वाळूची नाशिकला चोरटी वाहतूक करणारे 6 डंपर व मुरूमचे दोन ट्रॅक्टर महसूलच्या तीन विशेष पथकांनी जप्त केले. गुरुवारी (दि.9) सकाळी मनमाड चौफुली व सवंदगाव परिसरात केलेल्या कारवाईत हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी सिध्दार्थ रामकुमार यांनी सिन्नर महसूल कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही छापेमारी केली. . मालेगाव…

Read More

अकोल्यात पत्नीचा चाकूने भोसकून खून;‎ 2 चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले‎:‘मुलाला मारू नका'' म्हणून आईमध्ये पडली अन् गेला जीव‎

येथून जवळच असलेल्या बोरगाव‎ मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ‎‎यावलखेड येथे गुरुवारी सकाळी ‎‎‎घडलेल्या ‎‎‎धक्कादायक ‎‎‎घटनेत पतीने ‎‎‎कौटुंबिक‎‎ वादातून‎‎ पत्नीवर ‎‎धारदार शस्त्राने ‎‎‎हल्ला करून‎ तिची हत्या केल्याची घटना‎ उघडकीस आली. या घटनेमुळे ‎‎परिसरात मोठी खळबळ उडाली ‎‎असून, दोन लहान मुलांचे मातृछत्र ‎‎हरपले आहे. शहरातील डाबकी‎रोड पोलिस ठाणे हद्दीत अन्नपूर्णा‎माता मंदिर परिसरात पतीने ‎पत्नीचा खून करुन जाळून…

Read More