Headlines

सुनेत्रा पवारांनी सावध रहावे, स्वतःची काळजी घ्यावी:सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा सल्ला; शरद पवारांवरही साधला निशाणा

बीड येथील एका व्यक्तीने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जिवाला राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यापासून धोका असल्याचा दावा केला आहे. त्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी सुनेत्रा पवार सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. राजकारणात असा धोका असतो. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी सावध राहिले पाहिजे. स्वतःची काळजी घेतली पाहिजे,…

Read More

महात्मा फुले द्विशताब्दी जन्मोत्सव:महात्मा फुलेंनी त्या काळी सामान्य माणसाला शेअर बाजारही शिकवला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महात्मा जोतिबा फुले हे केवळ क्रांतीकारक समाजसुधारक नव्हते, तर ते प्रगतशील शेतकरी, कुशल नगररचनाकार आणि यशस्वी उद्योजकही होते. सामान्य माणसाला आर्थिक साक्षरता मिळावी म्हणून त्यांनी त्या काळात शेअर बाजाराचे कार्य कसे चालते, हे गीते आणि कवितांच्या माध्यमातून मांडले होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुलेंच्या विविधांगी कार्याचा गौरव केला. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने…

Read More

छगन भुजबळांच्या हेलिकॉप्टरचा अपघात थोडक्यात टळला:पायलटने हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅड ऐवजी चक्क कार पार्किंगमध्ये उतरवले

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगवेळी पायलकडून एक मोठी चूक झाल्याची घटना आज पुण्याच्या पुरंदर तालुक्यात घडली. पायलटने हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी चक्क कार पार्किंगमध्ये उतरवले. या घटनेमुळे घटनास्थळी काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पण भुजबळ हा प्रकार बाजूला सोडून आपल्या नियोजित कार्यक्रमाच्या दिशेने पुढे निघून गेले. पुरंदर तालुक्यातील…

Read More

शरद पवार गटाचा भाजप, RSS वर तिखट पलटवार:आचार्य तुषार भोसले हा भाजप, संघाने वारकरी संप्रदायात सोडलेला ढोंगी वारकरी

शरद पवारांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांच्या घुसखोरी झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरकसपणे पलटवार करत भाजप व संघाने तुषार भोसले नामक ढोंगी वारकरी, वारकरी संप्रदायात सोडला असल्याचा आरोप केला आहे. शरद पवारांनी शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या…

Read More

कर्जत-जामखेड मध्ये डिजिटल शैक्षणिक क्रांती:343 जिल्हापरिषद शाळांना 9 कोटी 64 लाख 27 हजार रुपये खर्चाचे डिजिटल साहित्य

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार हे उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आपल्या स्थानिक विकासनिधीतून कर्जत आणि जामखेड तालुक्यातील जिल्हापरिषद शाळांमध्ये डिजिटल शिक्षण सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सोमवार, दिनांक 13 एप्रिल, 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता या अभियानाअंतर्गत 140 शाळांमध्ये 65 इंची इंटरऍक्टिव्ह पॅनल, ई-लर्निंग…

Read More

अजित पवारांचा फोन सापडला, पण ब्लॅक बॉक्स कुठे?:सुप्रिया सुळेंचा रोष; म्हणाल्या, अशोक खरात प्रकरणामुळे राज्याची चेष्टा

सुप्रिया सुळे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून तपास यंत्रणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ झालेल्या या अपघातानंतर अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचे त्यांनी सांगितले. हा अपघात की घातपात, याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याने या प्रकरणातील तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात सर्वात मोठा मुद्दा म्हणजे ब्लॅक…

Read More

घुईखेड येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर उत्साहात:श्री संत बेंडोजी महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजन‎

चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथे श्री संत बेंडोजी महाराज प्रकट दिनानिमित्त नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे शनिवार (दि.११) रोजी आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर श्री संत बेंडोजी महाराज संस्थान, ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येत आहे. ११ एप्रिल…

Read More

भव्य भीमगीतांनी दुमदुमले नगर शहर; नागरिकांचाही मिळाला प्रतिसाद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरात भव्य भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक सुरेश बनसोडे यांच्या पुढाकारातून झालेला हा कार्यक्रम सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरला. गुरुवारी माळीवाडा येथे उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या दमदार सादरीकरणाने वातावरण…

Read More

बहुमत असूनही 'प्रशासकीय' हस्तक्षेपाने सत्ता हिसकावली:पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा पत्रकार परिषदेत आरोप

सातारा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर निर्माण झालेला सत्तासंघर्ष आणखी तीव्र झाला असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. बहुमत आमच्याकडे असतानाही प्रशासनाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्यात आली, असा गंभीर आरोप त्यांनी केला. कोयना दौलत डोंगरी महोत्सवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देसाई यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ही केवळ राजकीय लढत…

Read More

पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्तपदी के. मंजुलक्ष्मी रुजू:जनहितार्थ प्रकल्पांना गती देण्यावर भर देणार

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अतिरिक्त महानगर आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी (१० मे) पदभार स्वीकारला. महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी त्यांचे स्वागत करत पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. पदभार स्वीकारल्यानंतर के. मंजुलक्ष्मी यांनी ‘पीएमआरडीए’च्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की, पुणे महानगर प्रदेशाचा विस्तार लक्षात घेता,…

Read More