Headlines

दोन्ही राष्ट्रवादी एकच असण्याचं कारण वेगळं, वेळ आल्यावर बोलेन:सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला शरद पवार जातीलच- नाना पटोले




अजित पवार आणि शरद पवार हे काही वेगळे नाही ते एकत्रितच आहे हे मी अनेकदा सांगितले आहे. ते कौटुंबिक आहेत, सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला शरद पवार जातीलच, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होतो तेव्हाही हेच बोलत होतो, ज्यावेळी राष्ट्रवादीचे विभाजन झाले त्यावेळी सुद्धा मी हेच बोलत होतो कारण ते सत्य आहे. नाना पटोले म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे असे वाटण्याचे कारणच वेगळे आहे. ते आता बोलण्याची वेळ नाही. लाडकी बहिण योजनेला बदनाम करू नका. राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात मुठभर उद्योगपतींच्या कर्ज माफ त्यांच्यासाठी ज्या व्यवस्था केल्या त्यातून तिजोरीतील पैसा संपवला जात आहे. यातून लाडक्या बहिणीला बदनाम केले जात आहे. खरात सरकारचाच माणूस नाना पटोले म्हणाले की, अशोक खरात हा एका प्रकारे सरकारचाच माणूस आहे. अजून त्यांची बायको भेटली नाही. एसआयटीने ठोस काही कारवाई केली नाही. शेवटी अशोक खरात आणि त्यांच्यासोबत असलेले राजकीय नेते प्रशासकीय अधिकारी यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सीडीआर लोकांपर्यंत कसा पोहोचतो आहे. सरकारने ठोस कारवाई का झाली नाही असा सवाल लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. दोषींवर कारवाई का केली जात नाही. या प्रकरणात कोण आयपीएस, आयएएस आणि नेते यामध्ये आहेत. कोणाचा पैसा बाहेर देशात पाठवण्यात आला? असा सवाल पटोले यांनी केली आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? ऑपरेशन टायगरबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्र सरकारला काही देणं घेणं नाही. जनतेला गॅस मिळत नाही.तरुणांना रोजगार मिळत नाही. शेतकऱ्यांकडे तर सरकारचे लक्ष नाही. ठेकेदारांकडे सरकारचे लक्ष नाही. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा सवाल पटोले यांनी केला आहे. मुख्यमंत्री ज्या शहरात राहतात तिथे अनेक खून होतात. दिल्ली आणि राज्यातील सरकारचा आता शेवट आहे. आता हे सरकारच राहणार नाही. मोठ्या राजकीय खेळी होणार नाना पटोले म्हणाले की, भोंदू बाबा खरातच्या माध्यमातून अनेक नेत्यांचे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पैसे बाहेर देशात पाठवले जात होते म्हणून ईडी कारवाई या प्रकरणी स्वाभाविक आहे. अशोक खरात हे टार्गेट आहे, पुढे मोठ्या राजकीय खेळी होणार आहे. हे प्रकरण काही साधे नाही अनेक गोष्टी बाहेर येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *