![]()
चांदवड आणि देवळा तालुक्यात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, महसूल व कृषी प्रशासनाने कोणत्याही दिरंगाईशिवाय नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे पूर्ण करावेत. बाधित शेतकऱ्यांना जास्तीतजास्त शासकीय नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक
.
चांदवड आणि देवळा तालुक्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, मंत्री महाजन यांनी मंगरूळ (ता. चांदवड) आणि चिंचवे (ता. देवळा) येथे प्रत्यक्ष भेट देऊन शेती पिकांची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार गोकुळ गिते व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
दौऱ्यादरम्यान पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी तसेच पिकांच्या नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेतली. दुष्काळाच्या या कठीण काळात शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व उपाययोजना व मदत तत्काळ उपलब्ध करून देण्याची ग्वाही महाजन यांनी दिली.
माजी आमदार शिरीष कोतवाल, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे व संदीप काळे, भाजप नेते बाळासाहेब माळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती योगेश ढोमसे, विधानसभाप्रमुख शांताराम भवर, नगराध्यक्ष वैभव बागूल आदींसह शेतकऱ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.