![]()
श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींचे दीर्घकालीन जतन, संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि राज्य पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती संवर्धनाचे काम सुरू करण्यात आले आहे. दि. २२ सप्टेंबर रोजी रात्री द
.
दि. २२ सप्टेंबर रोजी रात्री दर्शन बंद झाल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या संवर्धनाच्या कामाची पाहणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, प्रकाश जवंजाळ, प्रणिता भालके यांनी केली. यावेळी कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, व्यवस्थापक प्रविणकुमार घम, लेखाधिकारी मुकेश अनेचा, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजी नगरचे उपअधीक्षक डॉ. एस. विनोद कुमार, पुरातत्त्व विभाग, पुणेचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे तसेच मंदिर समितीचे विभागप्रमुख उपस्थित होते.
मूर्ती संवर्धनाचे काम दि. २५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर शनिवार, दि. २६ सप्टेंबरपासून श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचे दर्शन भाविकांसाठी पूर्ववत सुरू केले जाईल , अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून संपूर्ण प्रक्रिये दरम्यान मंदिराचे पावित्र्य, धार्मिक परंपरा आणि सुरक्षा यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. पुरातत्त्व तज्ज्ञ, संबंधित अधिकारी आणि मंदिर समिती यांच्या समन्वयाने प्रत्येक प्रक्रिया काळजीपूर्वक पार पाडली जात आहे. गहिनीनाथ औसेकर, सहअध्यक्ष, मंदिर समिती.