Headlines

सॅटेलाईटच्या निकषात शेतकऱ्यांना अडकवू नका:दर 100 मीटरवर शेतीची माती बदलते, बच्चू कडूंची सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची मागणी




राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीवर शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. केवळ सॅटेलाईटच्या आकडेवारीवर आणि २१ दिवसांच्या पावसाच्या खंडासारख्या तांत्रिक निकषांवर अवलंबून न राहता, राज्य सरकारने तातडीने ‘सरसकट कोरडा दुष्काळ’ जाहीर करून शेतकऱ्यांना थेट मदत करावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. शेतीचे पोत दर १०० मीटरवर बदलते, त्यामुळे डिजिटल मोजमापाचा एकच निकष सर्वांना लावल्यास शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होईल, असा दावा त्यांनी केला आहे. हिरव्यागार शेतीचा आभास, पण दाण्यांत जीव नाही सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य मांडताना बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, पिकाला फळ धारणा होत असतानाच पावसाने नेमकी ओढ दिली. त्यामुळे पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. त्यानंतर आलेल्या थोड्या पावसामुळे आज शेती जरी हिरवीगार दिसत असली, तरी प्रत्यक्ष वस्तूस्थिती अतिशय भीषण आहे. सोयाबीनसारख्या पिकांच्या दाण्यांमध्ये बारकावा आला असून, बाजारात या पिकाला अजिबात भाव मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे हिरव्यागार दिसणाऱ्या पिकांवरून नुकसानीचा अंदाज लावणे चुकीचे ठरेल, असे ते म्हणाले. सॅटेलाईट आणि तांत्रिक निकषांवर थेट आक्षेप शासकीय स्तरावर दुष्काळ जाहीर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निकषांवर कडू यांनी कडाडून टीका केली आहे. शासन निर्णयात असलेला २१ दिवसांचा पावसाचा खंड किंवा विशिष्ट मिलिमीटर पावसाची अट शिथिल करण्याची मागणी त्यांनी केली. “शेती हा विषय केवळ सॅटेलाईट किंवा डिजिटल मोजमापाचा असूच शकत नाही. दर १०० मीटरवर शेतीची माती आणि पोत बदलते. काळी, लालसर, भुरकट अशा वेगवेगळ्या जमिनींवर सॅटेलाईटचा एकच निकष कसा लागू होऊ शकतो?” असा थेट सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. विहिरीच्या पाण्यावर जगवलेल्या शेतीचा निकष लावून कोरडवाहू शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवता येणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ‘सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करा’ बोटावर मोजण्याइतके तालुके वगळता आज संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. कुठे १०० टक्के, कुठे ७५ टक्के तर कुठे ५० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे केवळ मोजमाप करत बसण्यापेक्षा, सरकारने सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करावा. “सरकार जरी आमचे असले, तरी या दुष्काळातून शेतकऱ्याला उभे करण्यासाठी आणि त्याला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आम्ही आग्रही राहणार आहोत,” अशी स्पष्ट भूमिका बच्चू कडू यांनी मांडली आहे. हेही वाचा.. पुढच्या वर्षी लवकर या!: राज्यभरात अनंत चतुर्दशीचा अभूतपूर्व उत्साह, मुंबई-पुण्यात ढोल-ताशांचा गजर; 5 कोटी भाविक रस्त्यावर गेल्या दहा-बारा दिवसांपासून मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने पुजल्या गेलेल्या आपल्या लाडक्या विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्याचा भावुक क्षण अखेर आला आहे. आज अनंत चतुर्दशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांची धूम पाहायला मिळत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या एकाच जयघोषाने राज्यातील प्रमुख शहरे आणि गावे दुमदुमून गेली आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *