![]()
वाढत्या वयात हाडे पातळ, ठिसूळ होऊन हाडांची झीज आणि घर्षण आयुष्यभर सुरू राहते, त्यामुळे पुढे ऑस्टियोपोरोसिसची स्थिती निर्माण होऊ शकते. या निदानासाठी हाडांची घनता व ठिसुळपणा तपासणी आवश्यक असून, डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये आयोजित तपासणी शिबिरात १९५ रुग्णांनी लाभ घेतला. ही संपूर्ण तपासणी नि:शुल्क होती. गणेशोत्सवाच्या पर्वावर आयोजित या शिबिरातडॉ. अभिलाष पोहोकार, डॉ. मंगेश नवले यांनी रुग्णांची तपासणी केली. त्यांना डॉ . अवंतिका कोटेवार, डॉ. वर्षा केसवानी यांनी सहकार्य केले. वृद्धावस्थेच्या काळात हाडांची निर्मिती, नाश होतो. वयानुसार, हाडांच्या झीज होण्याचा दरही वाढतो. परिणामी, हाडांची घनता कमी झाल्याने हाडे सच्छिद्र, कमकुवत होतात. त्यामुळे ऑस्टियोपोरोसिसची स्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी बीएमडी टेस्ट (बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट) ही एक विशेष वैद्यकीय चाचणी असून, त्यामध्ये हाडे किती मजबूत आहेत किंवा ती किती ठिसूळ झाली आहेत, हे तपासले जाते. हाडांची ताकद मोजणे, हाडामध्ये कॅल्शियम आणि इतर खनिजांचे प्रमाण किती आहे, हेही याद्वारे समजते . बीएमडी तपासणीनंतर तज्ज्ञांनी प्रत्येक रुग्णाला वैयक्तिक उपचार सुचवून आजाराविषयी मार्गदर्शन केले. त्यामुळे शिबिराविषयी रुग्णांनी समाधान व्यक्त केले.असे शिबिर आयोजित करावेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. संदीप कुमार, गोपाल भागवतकर, आरती करवले, सोनाली पेंढारकर, ज्ञानेश्वरी जुमळे, प्रतिक भस्मे, राहुल लोंढे, धनश्री चव्हाण यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले. ऑस्टीओपोरोसिसमध्ये हाडे अतिशय कमकुवत, ठिसूळ होतात. या आजाराचे वेळेत निदान करण्यासाठी बीएमडी टेस्ट महत्त्वाची आहे. भविष्यात किरकोळ पडण्याने किंवा धक्क्याने हाड मोडण्याचा, फ्रॅक्चरचा धोका किती आहे, याचा अंदाज डॉक्टर या चाचणीवरून लावतात.
Source link
डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये बीएमडी तपासणी शिबिराचा 195 रुग्णांना लाभ:पडण्याने, धक्क्याने हाडावरहोणारा परिणामही कळतो