ठाण्यात रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असताना गस्त घालणाऱ्या एका पोलिस उपनिरीक्षकाची गावगुंडाने धक्काबुक्की करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या
.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरात पोलिस उपनिरीक्षक किसन भोईर रात्रीच्या सुमारास परिसरात नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. यादरम्यान परिसरातील काही दारूची दुकाने रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीर सुरू असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती. माहिती मिळताच पीएसआय किसन भोईर संबंधित ठिकाणी पोहोचले.
नक्की काय घडले?
कारवाईदरम्यान राजू वाल्मिकी नावाचा एक गावगुंड भररस्त्यात उघडपणे मद्यपान करत असल्याचे निदर्शनास आले. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या राजू वाल्मिकीला पीएसआय भोईर यांनी हटकले आणि पोलिस व्हॅनमध्ये बसण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यादरम्यान संतप्त झालेल्या राजू वाल्मिकीने पीएसआय भोईर यांना जोरात धक्का दिला. या धक्क्यामुळे किसन भोईर जमिनीवर आपटले.
डोक्याला तीव्र मार लागल्याने पीएसआय किसन भोईर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी राजू वाल्मिकीला ताब्यात घेतले आणि अटक केली. चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हे ही वृत्त वाचा
कुंडली दोषाच्या नावाखाली 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार:लातूरमध्ये भोंदू बाबाला अटक, पीडिता तीन महिन्यांची गर्भवती

तुझ्या पत्रिकेत कुंडली दोष आहे, तो दूर करायचा असेल तर एक पूजा घालावी लागेल, असे सांगत भोंदू बाबाने 17 वर्षांच्या तरुणीवर आपल्याच घरात अत्याचार केला. त्यामुळे पीडीता 3 महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर पीडीतेच्या तक्रारीवरून भोंदूविरोधात पोक्सो आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार लातुरातील विवेकानंद चौक पोलिसांत गुन्हा दाखल झाला. रामेश्वर हणमंतराव रामदासी (40) असे अटकेतील भोंदूचे नाव आहे.
लातुरातील मुलीचे लग्न जुळत नसल्यामुळे तिचे आई वडिल चिंताग्रस्त होते. परिचयातील काही लोकांनी रामेश्वर रामदासी हा महाराज यावर मार्ग काढतो अशी माहिती त्यांना दिली. त्यामुळे पीडीत मुलीचे पालक त्याच्याकडे गेले असता त्याने मुलीची पत्रिका पाहिली. तिच्या पत्रिकेत कुंडली दोष आहे, यासाठी पुजा घालावी लागेल असे सांगीतले. त्यामुळे जून 2026 मध्ये भोंदू तिच्या घरी गेला. भोंदूने वरच्या मजल्यावरील खोलीत पुजा मांडली. तर मुलीच्या आई वडिलांना दुसऱ्या खोलीत बसवले. नंतर खोलीचा दरवाजा लावल्यानंतर भोंदूने पीडीत मुलीला कुंडली दोष काढायचा असेल तर माझ्याशी शारिरिक संबंध ठेवावे लागतील, ही बाब कोणाला कळाली तर कुंडली दोष निघणार नाही असे सांगत तिच्यावर अत्याचार केला. वाचा सविस्तर