Headlines

सत्तेतील रेडे 'ज्ञानेशा'कडून आपले वेद वदवून घेत आहेत:निवडणूक आयोगाच्या कारभारावरून राज ठाकरेंचा घणाघात




निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि विशेषतः ‘एसआयआर’ (SIR) प्रणालीतील कथित घोळावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट करत भाजप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संत ज्ञानेश्वरांच्या रेड्याच्या उदाहरणाचा दाखला देत त्यांनी सद्यस्थितीवर टीका केली असून, ईव्हीएम हटवून पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत मोठे आंदोलन उभे करण्याची हाक दिली आहे. ‘ज्ञानेशा’कडून वेद वदवले जात आहेत… आपल्या पोस्टच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी उपहासात्मक शैलीत निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून (ज्ञानेश कुमार) आपले वेद वदवून घेत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला. गेले दोन दिवस मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गप्प का आहेत आणि त्यांना बोलतं करणारे कुठे गायब झालेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजपने सत्तेचा ‘अमरपट्टा’ कसा मिळवला आहे, हे आता समोर येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘SIR’ प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी करा मतदार याद्यांसंदर्भातील ‘एसआयआर’ प्रणालीच्या पारदर्शकतेवरही राज ठाकरे यांनी थेट आक्षेप नोंदवला. “सत्तेत राहण्यासाठी भाजपने २०२५ पासून ‘एसआयआर’ हे नवे अस्त्र हाती घेतले आहे. या प्रक्रियेत काय घोळ झालेत, यावर आता निवडणूक आयुक्तच बोलत आहेत. हे पाहता, ही एसआयआरची संपूर्ण प्रक्रियाच तातडीने रद्द केली गेली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली आहे. एसआयआरमधील घोळाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि ही प्रक्रिया नव्याने राबवली जावी, ही मनसेची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. ईव्हीएमविरोधात मोठ्या आंदोलनाची हाक केवळ एसआयआर प्रक्रियाच नव्हे, तर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनला (EVM) कायमचे हद्दपार करण्याची मागणीही राज ठाकरे यांनी केली आहे. “यापुढे सर्व निवडणुका व्होटिंग मशीनवर न घेता, त्या पुन्हा बॅलेट पेपरवरच घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मोठे आंदोलन उभे केले पाहिजे. तरच गेल्या इतक्या वर्षांचे ‘सत्तेचे सत्य’ बाहेर येईल,” असा घणाघात त्यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी.. ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो , गेले २ दिवस ज्ञानेश कुमार हे गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्याना हाताशी धरून आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे भारतीय जनता पक्ष सांगत होतं हे लक्षात आलं असेल. आणि यासाठी त्यांनी २०२५ पासून एसआयआर हे नवं अस्त्र हाती घेतलं आहे. एसआयआरमध्ये काय घोळ झालेत आणि यावर निवडणूक आयुक्तच बोलत आहेत हे बघितल्यावर, एकच पर्याय दिसतो तो म्हणजे ही एसआयआरची संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली गेली पाहिजे. आणि यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही मागणीच आहे की आत्ता झालेलं एसआयर पूर्ण रद्द करा, त्यात कसे घोळ झाले याची निष्पक्ष चौकशी करा आणि नव्याने ही प्रक्रिया करा.
तसेच , यापुढे सर्व निवडणुका व्होटिंग मशिनवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवरच घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे !
तरच इतक्या वर्षांच सत्तेचं सत्य बाहेर येईल ! हेही वाचा.. पुढच्या वर्षी लवकर या!: राज्यभरात अनंत चतुर्दशीचा अभूतपूर्व उत्साह, मुंबई-पुण्यात ढोल-ताशांचा गजर; 5 कोटी भाविक रस्त्यावर गेल्या दहा-बारा दिवसांपासून मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने पुजल्या गेलेल्या आपल्या लाडक्या विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्याचा भावुक क्षण अखेर आला आहे. आज अनंत चतुर्दशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांची धूम पाहायला मिळत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या एकाच जयघोषाने राज्यातील प्रमुख शहरे आणि गावे दुमदुमून गेली आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *