कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच ‘गोकुळ’च्या निवडणुकीला चांगलाच वेग आला असून, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना तीव्र वेग आला आहे. दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या आवाहनावर काँग्रेस नेते तथा आमदार स
.
सतेज पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद आणि महापालिकेची सभागृह अस्तित्वात येऊन अनेक महिने उलटले तरी सदस्यांना एक रुपयाचाही निधी मिळालेला नाही. जिल्ह्यातील दहा आमदारच सदस्यांच्या हक्काचा निधी पळवून नेत आहेत, त्यामुळे महायुतीच्या सदस्यांना सत्तेत आल्याचा पश्चाताप होत आहे.
आम्ही सर्व जागा लढवणार
सतेज पाटील म्हणाले की, विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार आहोत. ज्याची नोंदणी जास्त त्याचा उमेदवारीवर दावा असतो. गोकुळ निवडणूक बिनविरोध करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार आहोत.
हसन मुश्रीफांची भूमिका काय?
मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या बैठकीत गोकुळ निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता फेटाळून लावली होती. अदृश्य शक्ती आपोआप लुप्त पावली आहे, असे सांगत त्यांनी सतेज पाटील यांना महायुतीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. विनाकारण निवडणूक लढवण्यात अर्थ नसून सतेज पाटील यांनी सोबत आल्यास 1400 संस्थांच्या मनातील रोष दूर केला जाईल, असे मुश्रीफ यांनी म्हटले होते.
विरोधक उरलेच नाहीत- चंद्रकांत पाटील
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपावर भाष्य करताना म्हटले की, कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या हे लवकरच ठरवले जाईल. महायुतीकडे 4,400 ठराव असल्याने विरोधक उरलेच नाहीत. पितृपंधरवडा सुरू होत असल्याने अंबाबाईच्या चरणी साकडे घालून प्रचाराचा प्रारंभ केला जाईल. वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आल्याने मतभेद होतात, पण मतभेदातून मनभेदाकडे जाणार नाही याची काळजी घेतली जाई. हे ही वृत्त वाचा
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीची मोर्चेबांधणी:चंद्रकांत पाटलांनी सांगितला प्लॅन, 8 ऑक्टोबरला चित्र स्पष्ट होणार

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीला आता चांगलाच वेग आला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील आघाडीविरोधात महायुती एकत्रितपणे मैदानात उतरण्याची तयारी करत आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. वाचा सविस्तर