दुष्काळग्रस्त भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बांधावर जाऊन आढावा घेतला आहे. उद्धव ठाकरेंसारखे घरात बसणारे ‘देवाभाऊ’ नाहीत, अशी टीका करत भाजपने ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी जशी फसवी कर्जमाफी केली, तशी फसवी कर्जमाफी महायुत
.
नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे केवळ सर्वपक्षीय बैठका घेत होते, पण त्यांनी प्रत्यक्ष कोणतेही काम केले नाही. शेतकरी संकटात असताना त्याला कशी मदत करायची, हे महायुती सरकारला चांगले माहीत आहे. हातावर हात ठेवून बसणारे हे सरकार नसून, थेट बांधावर उतरून मदत करणारे मुख्यमंत्री आहेत, असा दावा त्यांनी केला.
राऊतांकडून गुलामगिरी सुरू
नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांच्याकडून राहुल गांधी यांची गुलामगिरी आणि काँग्रेसची चाटुगिरी करत रोज खोटं बोलण्याचे काम करत आहेत. राऊत देशाच्या विरोधात भूमिका घेत आहेत. पाकिस्तानधार्जिण भूमिका राऊत करत असतात. राऊतांकडून अजान पठण, नमाज महत्त्वाचे वाटते म्हणून ते बाप्पाच्या दर्शनासाठी गेले नाही.
राऊत ‘जनाबगिरी’ सोडत ‘भक्तगिरी’ करावी
नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊतांनी हे लक्षात ठेवावे की भारतीय नागरिक झोपलेले नाहीत ते जागे आहेत, त्यांनी तुमच्या इंडिया आणि मविआला झोपवण्याचे काम केले आहे. 2029 मध्येही इंडिया आघाडी, राहुल गांधी आणि उबाठाला जनता झोपवण्याचे काम करणार आहे. 2029 मध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवाभाऊंच्या नेतृत्वामधील सरकार येईल आणि तुम्हाला झोपवले जाईल. तुमचे सरकार येते त्यावेळी निवडणूक आयोगावर शंका घेतली जात नाही. पण भाजपचा विजय झाला तर निवडणूक आयोगावर शंका घेण्याचे काम करता हे चुकीचे आहे. निवडणूक आयोगावर शंका घेण्यापेक्षा आपले कार्यकर्ते सोबत आहेत का? हे बघा. तुम्हाला बीएलए मिळत नाहीत त्यांनी निवडणूक आयोगावर टीका करू नये.
दिपके ही काँग्रेसची बी टीम
नवनाथ बन म्हणाले की, अभिजीत दिपके ही काँग्रेसची बी टीम आहे. झारखंड आणि पंजाबमध्ये पेपरफुटी झाली त्यावेळी तिथे जाऊन यांनी आंदोलन केले नाही. झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन 15 दिवस सुरू होते त्यावेळी दिपके तिथे गेले नाही. त्यांच्या हितासाठी चकार शब्द ही दिपकेंनी काढला नाही. जंतरमंतरवर काय नौटंकी केली हे जनतेने बघितले आहे. जनतेला सर्व काही माहिती आहे, कोण बी टीम आहे आणि कोण काँग्रेसचा दलाल आहे हे सर्वांना माहिती आहे.
हे ही वृत्त वाचा
कुंडली दोषाच्या नावाखाली 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार:लातूरमध्ये भोंदू बाबाला अटक, पीडिता तीन महिन्यांची गर्भवती

तुझ्या पत्रिकेत कुंडली दोष आहे, तो दूर करायचा असेल तर एक पूजा घालावी लागेल, असे सांगत भोंदू बाबाने 17 वर्षांच्या तरुणीवर आपल्याच घरात अत्याचार केला. त्यामुळे पीडीता 3 महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर पीडीतेच्या तक्रारीवरून भोंदूविरोधात पोक्सो आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार लातुरातील विवेकानंद चौक पोलिसांत गुन्हा दाखल झाला. रामेश्वर हणमंतराव रामदासी (40) असे अटकेतील भोंदूचे नाव आहे.
लातुरातील मुलीचे लग्न जुळत नसल्यामुळे तिचे आई वडिल चिंताग्रस्त होते. परिचयातील काही लोकांनी रामेश्वर रामदासी हा महाराज यावर मार्ग काढतो अशी माहिती त्यांना दिली. त्यामुळे पीडीत मुलीचे पालक त्याच्याकडे गेले असता त्याने मुलीची पत्रिका पाहिली. तिच्या पत्रिकेत कुंडली दोष आहे, यासाठी पुजा घालावी लागेल असे सांगीतले. त्यामुळे जून 2026 मध्ये भोंदू तिच्या घरी गेला. भोंदूने वरच्या मजल्यावरील खोलीत पुजा मांडली. तर मुलीच्या आई वडिलांना दुसऱ्या खोलीत बसवले. नंतर खोलीचा दरवाजा लावल्यानंतर भोंदूने पीडीत मुलीला कुंडली दोष काढायचा असेल तर माझ्याशी शारिरिक संबंध ठेवावे लागतील, ही बाब कोणाला कळाली तर कुंडली दोष निघणार नाही असे सांगत तिच्यावर अत्याचार केला. वाचा सविस्तर